Vidarbha Travels Burned Esakal
नागपूर

Buldhana Bus Accident : 'आम्ही रात्री जेवण केलं, अर्ध्याच तासात बस दुभाजकाला धडकली अन..; प्रवाशांनी सांगितला अपघाताचा भयानक थरार

बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला.

या भीषण अपघातातून सुखरुप बाहेर पडलेल्या प्रवाशांनी या अपघाताचा थरार सांगितला आहे. या बसमध्ये सीट नंबर 19 आणि 20 वरती बसलेल्या दोन प्रवाशांनी या अपघाताबद्दल माहिती सांगितली आहे. (Latest Marathi News)

नागपूरवरून औरंगाबादकडे निघालेल्या काही प्रवाश्यांनी या भीषण अपघाताची माहिती सांगितली. 'आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. पलटी झाल्यानंतर लगेच बसने पेट घेतला. आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडलो'.(Latest Marathi News)

बस पलटी झाल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर टायरही फुटल्याचंही प्रवाश्यांनी सांगितलं. त्यानंतर डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट झाला. अपघात झाल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील आल्या. परंतु आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती बचवलेल्या प्रवाश्यांनी दिली आहे.

अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला. यात चार मुलांचाही समावेश आहे.(Latest Marathi News)

काचा फोडून काही प्रवासी बाहेर :-

विदर्भ ट्रॅव्हल्स पलटी होऊन अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले होते. चार ते पाच प्रवाशासह ट्रॅव्हल चालक व वाहक सुखरुप बचावले आहे.

मृतकामध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश :-

विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT