man attacked on person as he applied color on his wife  
नागपूर

बायकोला रंग लावला म्हणून युवकावर केले चाकूनं वार; होळीच्या दिवशीचा थरार 

संदीप गौरखेडे

कोदामेंढी ( जि. नागपूर) :  रंगपंचमी मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करण्याचा हा उत्सव. मात्र याच धुलीवंदनाच्या दिवशी बायकोला रंग लावल्याच्या रागातून एकाने चक्क चाकूने भोसकले. ही घटना मौदा तालुक्यातील अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तुमान येथील आहे.

सरताज ताराचंद रंधई (वय २४, तुमान) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंगात रंगून सरताज याने आकाश जयदेव झोडावणे याच्या पत्नीच्या अंगावर रंग टाकले. पत्नीच्या अंगावर रंग का टाकले, याचा राग आकाश याने मनात धरला. बायकोला रंग का लावले, म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांच्यात वादावाद झाले. 

यावरून आकाश झोडावाने याने मित्र मिथुन राजकुमार चवरे याच्याशी संगनमत करून सरताज याला चाकूने भोसकले. घटनेची माहिती अरोली ठाण्याचे ठाणेदार अशोक कोळी यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत रक्तबंबाळ असलेला सरताज याला प्रथम कोदामेंढी येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. 

त्यानंतर पुढील उपचाराकरिता भंडारा येथे हलविण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी आकाश झोडवणे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. झटापटीत मिथुन चवरे डोक्याच्या भारावर पडल्याने त्याच्या डोक्याला जखम झाल्याने तो देखील भंडारा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील तपास ठाणेदार अशोक कोळी, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

Pune fuel saving news : इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मेट्रो, बस व कार पूलिंगचा अधिक वापर करण्याचे निर्देश

KKR vs MI Live: मुंबई इंडियन्सच्या गटांगळ्या! वरुण चक्रवर्थी आपल्याच सहकाऱ्यावर खवळला, कोलकाताच्या ड्रेसिंग रूममध्ये तणाव... Video

SCROLL FOR NEXT