Man attacked on woman and bite her in Nagpur latest News  
नागपूर

अमानुष कृत्य! फेसबुक फ्रेंडचा महावितरणच्या महिला ऑपरेटरवर हातोड्यानं हल्ला; अंगालाही घेतला चावा 

योगेश बरवड

नागपूर ः प्रेमभंगामुळे निराश झालेल्या आरोपीने महावितरणच्या कार्यालयातच महिला ऑपरेटरवर चाकू व हातोड्यानिशी हल्ला चढविला. तिचे गाल व पोटालाही कडाडून चावा घेतला. तिच्या किंचाळण्याच्या आवाजामुळे अन्य कर्मचारी व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनीच आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी दुपारी गोदरेज आनंदम येथील महावितरणच्या कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली.

सचिन कांबळे (३८) रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर कॅम्प, मुंबई असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नागपूरकर असून नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक आहे. तर ३४ वर्षीय पिडिता वाठोडा मार्गावर वास्तव्यास असून गणेशपेठेतील मॉडेलमील मार्गावरील गोदरेज आनंदम सबस्टेशनमध्ये ऑपरेटर पदावर कार्यरत आहे. 

त्या पतीपासून वेगळ्या राहत असल्याचे कळते. प्राप्तमाहितीनुसार, पिडिता दोघांची फेसबूकवरून मैत्री झाली. अल्पावधीतच त्यांच्यातील मैत्री लग्नाच्या आणाभाका घेईपर्यंत पोहोचली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता. पीडिताने बोलणे बंद केले. फोनवरून ती प्रतिसाद देत नसल्याने चिडलेला सचिन बुधवारी नागपुरात दाखल झाला. 

झिंगलेल्या अवस्थेतच गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास तो पीडितेच्या कार्यालयात गेला. त्याने सोबत चाकू व हातोडाही आणला होता. माझ्यासोबत लग्न कर, अशी गळ घालत होता. शाब्दिक बाचाबाचीनंतर त्याने अचानक पीडितेवर हातोडा व चाकू उगारला. घाबरलेल्या पीडितेने बचावासाठी सचिनच्या डोळ्यात बोट टाकले. 

याप्रकाराने गडबडलेल्या आरोपीच्या हातून पीडितेने हातोडी हिसकावीत त्याच्याच डोक्यावर फटका हाणला. यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तिचे गाल व पोटाला चावा घेत दुखापत केली. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिचे डोके भिंतीवर आपटले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates: पहिला कल हाती, भाजपा आघाडीवर, बिहार विधानसभा निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Viral Video: बाबो... विजय देवरकोंडाने सगळ्यासमोर रश्मिकाला केलं किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

India vs South Africa : आजपासून भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना, प्लेईंग XI मध्ये कुणाला मिळणार संधी?

Bihar Election Results 2025 : बिहार निवडणुकीचा निकाल आज, नितीश कुमार की तेजस्वी; कोण होणार बाहुबली? देशाचे मतमोजणीकडे लक्ष

Girija Oak: माझा १२ वर्षांचा मुलगा आहे… तो बघेल तर? नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरीजा ओकची पहिली प्रतिक्रिया; अश्लील फोटोंवर नाराजी

SCROLL FOR NEXT