man committed to suicide in ambazari of nagpur 
नागपूर

क्षुल्लक वाद जीवावर बेतला, पत्नी व मुलीची आठवण आली अन् त्यानं उचलले टोकाचे पाऊल

अनिल कांबळे

नागपूर : क्षुल्लक वादातून पत्नी मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. तिला घरी आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. परंतु, पत्नी घरी येत नसल्यामुळे पतीच्या मनावर विपरित परिणाम झाला. पत्नी व मुलीच्या विरहात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना अंबाझरीत उघडकीस आली. 

स्नेहल हुसन ढोणे (३७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. स्नेहल हे एका प्रिंटींग प्रेसमध्ये ऑपरेटर होते. ते पत्नी व ८ वर्षाच्या मुलीसह टेकडी वाडी परिसरात राहत होते. एका वर्षांपूर्वी क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात पत्नी मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर राग शांत झाल्याचे बघून स्नेहल हे पत्नी व मुलीला आणायला गेले होते. मात्र, तिने सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे तो तणावात होता. घरात एकटाच राहत असल्यामुळे त्याला पत्नी व मुलीचा विरह सहन होत नव्हता. त्यामुळे त्याने दारू पिणे सुरू केले. गेल्या वर्षभरापासून तो एकाकी पडला होता. शेवटी त्याने मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Rain Nakshatra : यंदा पाऊस कसा पडणार? नक्षत्र अन् वाहनांवरून मिळाले मोठे संकेत; जाणून घ्या पावसाबाबत काय म्हणते शास्त्र

Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

SCROLL FOR NEXT