man end Life of a salon owner arguments in nagpur
man end Life of a salon owner arguments in nagpur  
नागपूर

'दाढीसाठी माझ्या आधी याला का बसवले' म्हणून नागपुरातील कामठीत सलून चालकाची हत्या

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन परिसरातील सलून चालकाचा  दाढी बनविण्याच्या क्षुल्लक  वादातून आरोपीने लाकडी दांडूने भिंतीवर आदळून तसेच गळा दाबून जागीच जीवानिशी ठार केल्याची घटना सायंकाळी नऊ वाजता दरम्यान घडली. मृतकाचे नाव सुदेश हंसराज थुले (५०) रा. न्यू खलाशी लाईन कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा व्यावसायिक मागील कित्येक वर्षांपासून नावीचे काम करीत असून जळल्याचे तेल देणारा म्हणूंन प्रसिद्ध आहे. आज मृतकाच्या चुलत पुतणीचे कामठी रोड वरील  एका लग्न सभागृहात आयोजित लग्न समारंभाचे कार्यक्रम आटोपून सायंकाळी न्यू खलाशी लाईन स्थित सुदेश कटिंग सलून नामक दुकान उघडुन काही ग्राहकांची दाढी बनवत असता दरम्यान आरोपी आकाश हाटे नामक तरुण येऊन माझी दाढी आधी बनवून दे माझ्यापुर्वी याला का बसवला यावरून वाद झाला. .

झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेला असता मृतकाचे संबंधित नातेवाईक  तसेच आरोपी आकाशमध्ये झालेल्या भांडणाचा वाद कसाबसा आटोपला मात्र आरोपीने हा वाद डोक्यात शिरून घेत या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने आपल्या इतर मित्रांना सहपाठी घेऊन सदर मृतकाची कटिंग सलून दुकानात हल्ला चढवीत मृतकाला लाकडी दांडूसह गळा दाबून जीवानिशी ठार केले. 

यानंतर आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढल्याची घटना घडली असून  सदर घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह तांब्यात घेत मृतकाच्या  पार्थिवावर शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. 

मृतकाचे पार्थिव शासकोय उपजिल्हा  रुग्णालय च्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले पोलिसांनी यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे यासंदर्भात आरोपी आकाश हाटे ला अटक केल्याची माहिती असून इतर आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत. पुढील तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT