man is no more who wants to borrow wine  
नागपूर

दारू उधार मागणाऱ्या युवकाचा खून; माजरी गावातील घटना; आठ तासांत आरोपींना अटक

अनिल कांबळे

नागपूर : अवैध दारूविक्रेत्याला दारू उधार मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून युवकाचा तलवारीने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना शुक्रवारी माजरी गावात घडली. सुबोध ऊर्फ बापू विशाल मेश्राम (वय २२, रा. पाटील लेआऊट, माजरी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. प्रणय ऊर्फ गोलू राऊत (वय २२), सागर परिमल (वय २०) आणि अभिषेक चौधरी (सर्व रा. माजरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

प्रणय हा पूर्वी कॅटरिंगचे काम करीत होता. पण, करोनामुळे देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्याचा रोजगार गेला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो अवैधपणे देशी दारू विकत होता. सुबोध हा दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने तो नेहमी प्रणयकडे दारू प्यायला यायचा. सुबोधवर दारुचे जवळपास हजार रुपये उधार होते. तो पैसे देत नसल्याने आरोपींसोबत त्याचा वाद होता. 

शुक्रवारी सायंकाळी तो दारू पिण्यासाठी गोलूच्या घरी आला. त्याने गोलूच्या आईला उधार दारू मागितली. मात्र तिने दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे सुबोध चिडला. त्याने गोलूच्या आईला शिवीगाळ केली आणि निघून गेला. रात्री आठ वादताच्या सुमारास मुलगा गोलू घरी आला. त्याला आईने सुबोधने शिवीगाळ केल्याबाबत माहिती दिली.

शुक्रवारी रात्री १२.३० ते १.२० वाजेच्या सुमारास आरोपी सुबोधच्या घरी गेले. त्याला फोन करून बाहेर बोलावले. त्याला माजरी परिसरातील एम्ब्रॉयडरी कारखान्याजवळ गाठले. त्या ठिकाणी आरोपींनी सुबोधकडे पैशाची मागणी केली. त्याने नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादातून हाणामारी झाली. 

त्यावेळी आरोपींनी मिळून चाकूने सुबोधच्या गळयावर मानेवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे हे इतर कर्मचार्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : २५ वर्षांचा काळा हिशेब, ६,३८१ शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करा - असीम सरोदे

Shreyas Iyer चं कमबॅक होणार, तेही कर्णधार म्हणून; दोन सामन्यांत करणार नेतृत्व

Mumbai Election Polls : अपक्षांचे फुटले पेव! पालिका निवडणुकीसाठी तब्बल ५५१ उमेदवार

Kolhapur ST : 'फोन पे–गुगल पे' ने बदलली एसटीची सफर; प्रवासीही खूश, महसूलही वाढला

SCROLL FOR NEXT