man who came from Britain tested corona positive in Nagpur
man who came from Britain tested corona positive in Nagpur  
नागपूर

नागपुरात प्रशासनाचे धाबे दणाणले: इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या युवकामुळे तब्बल १० जण पॉझिटिव्ह; नमूने पुण्याच्या एनआयव्हीकडे

केवल जीवनतारे

नागपूर ः लक्षणे नसल्याने गृहविलगीकरणात असलेल्या एक युवक नियम न पाळता नागपूर गोंदियात सर्रास फिरस्ती म्हणून वावरला. कुटुंबातील व्यक्तीसह इतरांसाठी मात्र हा युवक घातक ठरला आहे. त्यांच्या संपर्कातील तब्बल १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. विशेष असे की, या युवकाला इंग्लड प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने कोरोनाच्या बदलत्या (नवीन) रुपातील लागण झाली असावी अशी शंका व्यक्त करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली असून मेडिकलमध्ये बुधवारी दाखल करण्यात आले. 

त्याच्या घशातील व नाकातील द्रवाचे नमूने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले आहेत. एनआयव्हीतून आलेल्या अहवालानंतरच नवीन कोरोना आहे की, जुनाच आहे, हे स्पष्ट होईल.

या रुग्‍णांवरचा निरीक्षणावरील अंकुश हरवल्याचे तसेच यांना औषध पुरवण्यात येत नसल्याने गृहविलगीकरणातील व्यक्ती बिनधास्त भटकंती करीत असल्याचे नमूद आहे. लगेच त्याच दिवशी एका तरुणामुळे किमान दहा व्यक्तींना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. इंग्लड येथील प्रवासाची पार्श्वभूमी असलेला युवक नागपूरच्या नंदनवन येथील रहिवासी (वय २८) आहे.  

पुणे येथील एका कंपनीत तो कार्यरत आहे. कंपनीच्या कामानिमित्त महिनाभरापुर्वी इंग्लड येथे गेला होता.२९ नोव्हेंबरला नागपुरात परतला. लक्षणे नसल्यामुळे गृहविलगीकरणात राहाण्याची सूचना संबधितांनी केली. त्याला काही लक्षणे आढळून आली. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान घरातून तो निघाला. गोंदिया येथे कामासाठी गेला. यानंतर त्याने कोरोना चाचणी केली. कोरोनाची बाधा झाल्या स्पष्ट झाले. संबधितांनी या युवकाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी केल्यानंतर घरातील  ४ ते ५ व्यक्ती बाधित आढळून आल्या. तसेच गोंदियात काही व्यक्तींच्या संपर्कात आलेले ३ ते ४ जण कोरोनाबाधित आढळले. मात्र दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये सापडलेला नवीन कोरोना विषाणू तर नाही, असा संशय घेण्यात आला. तत्काळ मेडिकलमध्ये विशेष कक्षात दाखल करण्यात आले. 

इंग्लडहून परतल्याचे कळल्याने धाबे दणाणले

हा युवक इंग्लंडहून नागपुरात परतल्याचे स्थानिक प्रशासनाला कळाले. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. यामुळे तातडीने दखल घेत रुग्णाला मेडिकलमध्ये उपचाराला हलवत स्वतंत्र पेईंग वार्डातील खोलीत तात्पूरत्या स्वरुपात ठेवण्यात आले आहे. या युवकाच्या घशातील व नाकातील द्रवाचे नमूने चाचणीसाठी घेण्यात आले. पूणेतील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. तर दुसरे नमुने घेत मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासले जात आहेत. 

प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा 

या युवकामुळे बऱ्याच व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आल्यामुळे कोरोनाच्या रुप बदलेला नवीन विषाणू असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासनासह मेडिकलच्या डॉक्टरांसह सर्वच अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषाणू नवीन कोरोनाचे आहे की जुनाच कोरोना आहे, हे स्पष्ट होईल. अता सगळ्यांचे लक्ष एनआयव्हीच्या अहवालाकडे लागले आहे. रुग्णाला मेडिकलमध्ये ठेवल्याच्या वृत्ताला मेडिकल प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT