Shivsena Media Gallery
नागपूर

शिवसेनेत होणार मोठा स्फोट? अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

राजेश चरपे

नागपूर : माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याने शिवसेनेमध्ये (Shivsena) चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेची मुंबईतून दखल घेण्यात आली असून नागपूरमधील उफाळून आलेल्या असंतोषाचे कारण काय अशी विचारणा एका माजी पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले असल्याने लवकरच संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सावरबांधे पाठोपाठ अनेक पदाधिकारी सेना सोडण्याच्या तयारीत आहेत. यात एका नगरसेवकाचाही समावेश असल्याचे कळते. स्थानिक नेत्यांमुळे अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मोठी पदे दिली तर त्यांना निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा देण्यात आले नाही. काहींना मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेत प्रवेश करून फसलो अशी भावना आता अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूरचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली तेव्हापासूनच असंतोष उफाळून आला आहे. जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे डिमोशन केले होते. उलट कालपरवा काँग्रेसमधून आलेल्यांना डोक्यावर बसवल्याने नाराजी वाढली आहे. माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी त्याचवेळी नाराजी दर्शवून आपण दिलेली जबाबदारी पार पाडू शकत नाही असे कळविले होते. सावरबांधे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र, पदभारसुद्धा स्वीकारला नव्हता. आजही अनेक निष्ठावंत शिवसेनेत आहेत. मात्र, पक्षकार्यापासून अलिप्त आहेत. अनेकजण आपल्या स्तरावर काम करीत आहेत. सावरबांधे तडाकाफडकी पक्ष सोडतील असे कोणालाच वाटले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी इतरांसोबत सल्लामसलतसुद्धा केली नाही. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नाराज पदाधिकारी बाहेर पडू शकतात अशी भीती वर्तविली जात आहे. नाराज असलेल्यांना रोखण्यासाठी एका स्थानिक शिवसैनिकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी आज सुमारे डझनभर सैनिकांना फोन केले. कुठलाही आततायी निर्णय घेऊ नका अशी सूचना सर्वांना देण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT