नागपूर

मार्डच्या डॉक्टरांनी दिला ICUमधील रुग्णसेवा थांबवण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीड वर्षांपासून सर्व निवासी डॉक्टर (Resident Doctors) कोरोना रुग्णांवरील (Corona Patients) उपचारात गुंतवण्यात आले आहे. इतर रुग्ण तपासण्यासाठी वेळच दिला जात नाही. आता कोरोना काहीसा कमी झाला आहे. आतातरी सर्जिकल कॉम्प्लेक्स (Surgical Complex Nagpur) नॉनकोविड रुग्णांसाठी सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याने सामूहिक रजेवर असलेल्या मार्ड संघटनेतर्फे अतिदक्षता विभागातील सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. (MARD doctors protesting in Nagpur Mayo hospital)

मेयो रुग्णालयात सुमारे २४० पेक्षा अधिक निवासी डॉक्टर आहेत. मेडिसीन, पॅथालॉजी, कान नाक घसा विभाग, सामाजिक वैद्यक शास्त्र, सर्जरी, नेत्र, बालरोग विभाग, प्रसूती रोग विभाग तसेच इतरही विभाग आहेत, मात्र साऱ्या निवासी डॉक्टरांना कोविड रुग्णांची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून केवळ कोरोना रुग्णांवरच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे इतर विषयांकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या मेयो असो की, मेडिकल येथे रुग्णसंख्या कमी झाली आहे.

यामुळे आता नियमित ज्या विभागाशी संबंधित निवासी डॉक्टर आहेत, त्यांना त्या विभागाचा अभ्यास करण्यासाठी मोकळीक द्यावी. मात्र स्थानिक प्रशासन चुप्पी साधून आहे. यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू असतानाच अतिदक्षता विभागातील सेवा थांबवण्याचा इशारा दिला आहे.

मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल,डॉ. आसिफ पटेल, डॉ. ईश्वर पाटील, डॉ. गणेश पारवे, डॉ. आशिष केंद्रे, डॉ. अद्वैत मुळे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. सुजाता मेटे, डॉ. ख्याती जैन यांच्यासह शेकडो डॉक्टर मेयो परिसरात उभारलेल्या मंडपात दिवसभर स्थानिक निर्णयाच्या प्रतीक्षा करीत बसून असतात.

(MARD doctors protesting in Nagpur Mayo hospital)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

DY Patil News : 'आजोबांचे संस्कार हीच माझी ताकद'; डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर नात राजलक्ष्मी पाटील यांनी सांगितल्या आजोबांच्या आठवणी

Farmer Loan Waiver: मंगळवेढ्यातील 2418 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफीचा लाभ; मरवडे गावातील सर्वाधिक लाभार्थी

SCROLL FOR NEXT