गुणवंतराव चौधरी यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना गुणवंतराव चौधरी यांच्या शेतीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना
नागपूर

अतिवृष्टीत नवखे प्रयोग करणारे सावरले; फुलविली शेती

मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर) : पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीची कास धरून योग्य नियोजनाने लाखोचे उत्पादन घेतल्याचा यशस्वी प्रयोग माळेगाव येथील शेतकरी बंडू ऊर्फ गुणवंत त्र्यंबकराव चौधरी यांनी वडिलांच्या प्रेरणेने साकारला आहे. त्यांच्या वडिलांनी आधुनिक शेतीची कास धरून सेंद्रिय शेतीचा प्रयोग करावा, असा मंत्र दिला होता.

चौधरी यांना शेतीची आवड असल्याने नेहमीच केळीचा बाग, हळद, लसूण, इतर नव्या वानांची लागवड करून वर्षाकाठी नवखे प्रयोग करून बघतात आणि त्यांना यशही मिळत आहे. असाच प्रयोग करण्यास चौधरी इतर शेतकऱ्यांना सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनात काही शेतकऱ्यांनी लाभ मिळविला आहे. यंदाचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे वाया गेले. पिकांना पावसाचा फटका बसल्याने कपाशी तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. फळबागानांही फटके बसले.

परंतु, यातून नवखे प्रयोग करणारे शेतकरी मात्र सावरलेत. तालुक्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंतराव चौधरी यांनी झेंडू पिकाला सणासुदीच्या दिवसात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे व खात्रीने फुले देणारे पीक म्हणून त्यांनी माळेगाव शिवारातील शेतीमध्ये कापूस, तूर, मका, भाजीपाला याशिवाय उर्वरित तेरा एकर शेतीत झेंडू फुलांची लागवड करून फुलबाग फुलविली व शेतीला नवी जोड दिली आहे.

किमया बघण्यासाठी या शेतात!

श्रावण, गणेशोत्सव, दसरा नुकताच संपला आणि येऊ घातलेला दिवाळी उत्सव या सगळ्याच सणांसाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पारंपरिक शेती सोबतच नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या गुणवंतराव चौधरी व त्यांच्या मार्गदर्शनातील काही शेतकऱ्यांनी या पिकाकडे लक्ष वळवल्याने झेंडू फुलांची शेती फायद्याची ठरली आहे. चौधरी यांची झेंडू फुलांनी बहरलेली शेती बघून बरेच शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, कृषी विभागातील कर्मचारी सुद्धा त्यांची ही किमया बघण्यासाठी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT