Market and weekly market closed Police patrols at intersections Nagpur mini lockdown news
Market and weekly market closed Police patrols at intersections Nagpur mini lockdown news 
नागपूर

‘ब्रेक द चेन’ : बाजारपेठा, आठवडी बाजारात शुकशुकाट; पोलिसांचा चौकाचौकांत बंदोबस्त

राजेश प्रायकर

नागपूर : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शहरातील सर्वच बाजारपेठा, भाजीबाजारांत शुकशुकाट दिसून आला. काही भागात आठवडी बाजारही भरला नसल्याचे दिसून आले. केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू होती. परंतु, तेथेही दुकानदारांकडून ग्राहकांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

राज्य सरकारने सोमवारी रात्री आठ वाजतापासून कडक निर्बंध लागू केले. नागपुरात कडक निर्बंधाच्या पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांचे एक तासाचे आंदोलन वगळल्यास सिताबर्डी, गांधीबाग, इतवारी, महाल, सक्करदरा, इंदोरा, सदर येथील बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत गर्दी दिसून येणाऱ्या या बाजारांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

हॉटेल, रेस्टॉरंट बंद असले तरी पार्सल सुविधा सुरू असल्याने काही प्रमाणात ग्राहक दिसून आले. याशिवाय रस्त्याच्या बाजूला फळविक्रेते, ज्यूसविक्रेत्यांचे स्टॉल सुरू असले तरी ग्राहक मात्र नसल्याने त्यांच्या रोजगारावर परिणाम झाल्याचे एका विक्रेत्याने सांंगितले. मेडिकल स्टोअर, किराणा व्यावसायिकांनी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. अनेक किराणा दुकानदारांनी ग्राहकांकडून वस्तूंची यादी घेऊन घरपोच साहित्य पोहोचून देण्याचीही तजवीज केली होती. पोलिसांचा चौका चौकांत बंदोबस्त असल्याने रस्त्याने फिरणाऱ्यांच्या संख्येतही चांगलीच घट बघायला मिळाली.

रस्त्यांवरील गर्दी नियंत्रित

कडक निर्बंधामुळे शासकीय कर्मचारी कार्यालयात पोहोचते वेळी तसेच परत येतेवेळी रस्त्यावर थोडीफार गर्दी होती. परंतु, दिवसभर दररोज दिसणारी गर्दी आज ओसरल्याचे चित्र होते. केवळ डिलिवरी बॉय रस्त्यावर फिरताना आढळले. बाजारपेठ बंद असल्याने व्यापारी, तेथील कर्मचारी घरीच असल्याने त्यांची वाहने आज बाहेर निघाली नाही. त्यामुळे वाहतूक सुरू असली तरी आज वाहनांची गर्दीही नियंत्रणात दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT