नागपूर : लग्न समारंभासाठी निश्चित केलेल्या तारखाही आता बदलाव्या लागणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 31 मार्चपर्यंत लॉन, मंगल कार्यालये बंद ठेवा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने अनेकांच्या लग्नात विघ्न येण्याची शक्यता आहे.
शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने विविध पाऊले उचलली आहे. याचा परिणाम आता लग्नाची तयारी पूर्ण झालेल्यांनाही बसण्याची शक्यता आहे. अनेकांनी मोठ्या बाधा पार करीत लग्नाचे मुहूर्त काढले. त्यानुसार मंगल कार्यालये, लॉनही 'बुक' केले. वधू व वरासाठी कपडेही खरेदी झाले. मात्र, आता कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानमुळे लग्नात विघ्न येण्याची शक्यता बळावली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज शहरातील सर्व लॉन, मंगल कार्यालयेही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व शहर प्रशासनातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, जिम आदी मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच राज्य शासनाने दिले. त्यानुसार मनपा हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, जिम आदी बंद ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. मात्र किराणा दुकान, औषधालय, दूध, भाजीपाला व अन्य आवश्यक सेवा सुरू ठेवाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. शहरातील सर्व धार्मिक तथा सार्वजनिक कार्यक्रमही तूर्तास स्थगित करण्यात यावे, सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व लॉन तसेच मंगल कार्यालयातील कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे.
मनपा हद्दीबाहेरील महाविद्यालयही बंद करा'
मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपाच्या हद्दीबाहेरीलही अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालयात बाहेरगावचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. शहरातील सर्व ट्यूशन क्लासेसही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.