mask.
mask. 
नागपूर

कोरोनाची कमाल! मास्कनंतर आता "सॅनिटायझर'चा संपला स्टॉक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : त्यातच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे आणि त्याबाबत सोशल मीडियावर वाढत्या प्रचारामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये पहिले मास्काचा साठा संपला आता सॅनिटायझरला मागणी वाढली आहे. त्यामुळे दोन्हीची टंचाई निर्माण झालेली आहे.
गत आठवड्यात विदर्भात सर्वत्र अवकाळी पाऊस पडला. हिवाळ्याचा अंतिम टप्पा आणि उन्हाळ्याचा प्रारंभ यातच पाऊस पडल्याने वातावरणात बदल झाला. सकाळी थंडी तर दुपारी उष्मा अशा द्विधा वातावरणात मानवी आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे ताप, थंडी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांचा त्रास अनेकांना होऊ लागला आहे. यामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरण बदलामुळे नागरिकांनी आहार कसा घेतला पाहिजे, याबाबत जागृती केली जात आहे.
दुसरीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नागपूर शहरातील मेडिकल स्टोअर्समधील उपलब्ध साठा संपला असून वाढत्या मागणीमुळे मास्क आणि सॅनिटायझरच उपलब्ध होत नसल्याने औषध व्यापारी चिंतेत आहेत.
कोरोनासारख्या आजाराला घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाबाचे प्रमाण वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घाबरून जाण्याऐवजी पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्‍टर देत आहेत.

आऊट ऑफ स्टॉक
गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून मास्कची मागणी अचानक वाढल्याने स्टॉक संपला होता. त्यापाठोपाठ आता सॅनिटायझरची मागणी वाढल्याने ते ही "आऊट ऑफ स्टॉक' झालेला आहे. पुरवठाच होत नसल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे.
अजय अग्रवाल, संचालक, सुंदर मेडिकल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT