नागपूर

नागपुरात दोन आरा गिरण्यांना भीषण आग; दोन कर्मचारी बेशुद्ध

राजेश चरपे

नागपूर : भीषण आगीमुळे (Fierce fire) लकडगंज परिसरात असलेल्या दोन आरा गिरण्या जळून खाक (Burn the saw mill) झाल्या. याशिवाय गिरणीच्या शेजारी असलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. सुमारे तीन तास आगीचे तांडव सुरू होते. महापालिकेच्या अग्निशनम विभागाने दाहा पाण्याचे बंब पाठवून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीच्या धुरामुळे अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी बेशुद्ध (Two employees unconscious) पडले होते. (Massive fire at two sawmills in Lakdaganj Nagpur)

सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरा गिरणीला आग लागली. ती कशामुळे लागली, हे अद्याप समजलेले नाही. मात्र परिसरात अनेक आरा गिरण्या असल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेतली. लकडगंज, गंजीपेठ, सुगतनगर, सक्करदरा, कळमना, कॉटेन मार्केट आणि त्रिमूर्तीनगर येथील अग्निशमन कार्यालयातून तातडीने १० पाण्याचे बंब पाठवण्यात आले.

अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके, स्टेशन अधिकारी मोहन गुद्धे, अग्निशमन दलाचे प्रवीण झाडे, नितीन वैद्य, खापेकर यांच्या देखरेखीत अग्निशमन दलाने आग विझवणे सुरू केले. तब्बल तीन तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत अशोक ढोबले, एम. अश्विन इमारती लाकूड इमारत आणि भाडेकरू एस. अपना गुड्स गॅरेज, ग्रॉसरी मटेरियलचे दुकान, नानाजी रामभाऊ खेडकर यांच्या मालकीचे परमात्मा एक फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले.

राजेंद्र टिंबर मार्टचे मालक राजेंद्र नारायण ढोबळे यांच्या गिरणीतील जॉब वर्क मशीन, शर्मा स्टार फर्निचर मालक रोहित शर्मा चार जॉब वर्क मशीन, एक मोटारसायकल, एक स्कूटी आगीत भस्मसात झाली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी प्रवीण झाडे आणि एक सफाई कर्मचारी बेशुद्ध पडले होते. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता.

लगेच लकडगंज परिसरातील न्यू इरा इस्पितळात त्यांना दखल करून उपचार करण्यात आले. दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मनपाच्या वतीने कळविण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.

(Massive fire at two sawmills in Lakdaganj Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : आक्रमक राजकारणाला काहीही स्थान नाही - शायना एनसी

SCROLL FOR NEXT