नागपूर

महापौरांच्या वाहनाला दिव्यांगांच्या वाहनांचे जॅमर!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्टॉलवर अतिक्रमण विभागाकडून होत असलेली कारवाई रोखण्याची मागणी करीत शुक्रवारी दिव्यांगांनी महापालिकेत धडक दिले. महापौरांच्या वाहनापुढे तसेच मागे दिव्यांगांनी वाहने उभी करून एकप्रकारे जॅमरच लावले.

महापालिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्यांगांचे स्टॉल हटविण्याची कारवाई केली. अजूनही ही कारवाई सुरू असल्याने संतप्त झालेल्या दिव्यांगानी आज विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरिधर भजभुजे यांच्या नेतृत्त्वात महापालिकेवर धडक दिली. दिव्यांगांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांची आक्रमकता बघता महापालिकेने पोलिसांना आमंत्रित केले.

महापौर कक्षाभोवती पोलिसांचा गराडा होता. दुसरीकडे दिव्यांगांनी महापौरांच्या वाहनांपुढे व मागे त्यांची वाहने उभी करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. अखेर समितीचे अध्यक्ष भजभुजे यांना निवेदन घेऊन बोलावण्यात आले. गठई कामगारांच्या शेडबाजूलाच दिव्यांगांना स्टॉल देण्याबाबतची आठवण भजभुजे यांनी महापौरांना करून दिली.

आतापर्यंत पदावरील सर्वच महापौर तसेच आयुक्तांनी दिव्यांगांना खोटे आश्वासन दिल्याचे आरोपही भजभुजे यांनी केला. स्टॉल तर दिले नाहीच, शिवाय जे सुरू आहेत, त्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी भजभुजे यांनी महापौरांकडे केली. महापौरांशी चर्चा सुरू असतानाच बाहेर दिव्यांगांची घोषणाबाजी सुरू असल्याने परिसर दणाणला.

महापालिकेकडून दिव्यांगांचे स्टॉल हटविण्यात येत आहे. दिव्यांगांची स्टॉलची मागणी असून ते अजून पूर्ण झाली. त्यात कारवाई सुरू केली. महापौरांनी कारवाई रोखण्याचे आश्वासन दिले.
- गिरिधर भजभुजे, अध्यक्ष, विदर्भ विकलांग संघर्ष समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT