Mayor sandeep joshi's orders rejected by Commissioner Tukaram Mundhe 
नागपूर

आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या मनात चाललयं तरी काय? स्पष्ट शब्दात कळवला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रशासनाला दिलेले आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धुडकावून सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. यावर सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे. 

महापालिकेच्या सभेत महापौरांनी ज्या विकासकामांचे कार्यादेश झाले आहे ती कामे सुरू करण्यास तत्काळ परवानगी द्यावी तसेच लेखा व वित्त अधिकारी यांची प्रतिनियुक्ती बेकायदेशीर असल्याने त्यांना परत पाठवण्यात यावे, असे आदेश आयुक्तांना दिले होते. यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी आयुक्‍तांनी आदेशावर आपले मत लेखी कळविले आहे. 

महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. कोट्यवधींची जुनी देणी द्यायची आहे. अशा परिस्थितीत नव्या कामांना मंजुरी देता येणार नाही. कार्यादेशही देता येणार नाहीत. ते शक्‍यसुद्धा नाही असे पदाधिकाऱ्यांना कळविले आहे. याशिवाय महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर यांना सोडता येणार नाही. राज्य शासनाकडे पर्यायी अधिकारी देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. सरकारकडून पर्यायी अधिकारी प्राप्त झाल्यावर मोना ठाकूर यांना कार्यमुक्त केले जाईल, असा स्पष्ट शब्दात त्यांनी कळविले आहे. 

साधा नियम त्यांना ठाऊक नाही
महापौरांनी दिलेले आदेश आयुक्तांनी नीट वाचल्याचे दिसत नाहीत. आम्ही नवीन कामांना मंजुरी द्यावी असे आदेश दिले नव्हते. ज्या कामांचे कार्यादेश झाले आहेत ती कामे सुरू करण्यास सांगितले होते. एकदा सभागृहाने परत पाठवलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्त करता येत नाही. हा साधा नियम त्यांना ठाऊक नाही यावर विश्‍वास बसत नाही. इतरांना नियम पाळण्यास सांगायचे आणि स्वतः नियम तोडायचे असा हा प्रकार आहे. 
- दयाशंकर तिवारी, 
ज्येष्ठ नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT