mayor sandip joshi tested positive for corona  
नागपूर

महापौर संदीप जोशींना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महापौर संदीप जोशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या ८ महिन्यांपासून कोरोनाशी लढत असून शेवटी मलाच कोरोनाची लागण झाली आहे. काल कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

नुकत्याच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक पार पडली आहे. संदीप जोशी यांनी भाजपच्या उमेदवारीवर ही निव़डणूक लढविली होती. या निवडणुकीचा प्रचारासाठी ते गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ते फिरले होते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते तसेच मतदार त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

दरम्यान, नागपुरात बुधवारी कोरोनाचे नव्याने ४०३ रुग्ण सापडले असून ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण  ५८७३ जणांवर उपचार सुरू आहे. यापैकी ११०९ रुग्ण नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेडीकलसह जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर उर्वरीत रुग्ण गृहविलगणीकरणात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT