mbbs student solved paper by using whats app and google in nagpur  
नागपूर

पुन्हा आढळला 'मुन्नाभाई एमबीबीएस', व्हॉट्सअ‌ॅप अन् गुगलचा वापर करून लिहित होता प्रश्नांची उत्तरे

केवल जीवनतारे

नागपूर : एमबीबीएस तिसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचा बालरोग विषयाचा पेपर होता. या लेखी पेपर परीक्षेचा मेडिकलमध्ये पेपर सोडवताना एक विद्यार्थी मुन्नाभाई स्टाईलने व्हॉंट्स अ‌ॅप आणि गुगलवरून उत्तरे सर्च करून लिहीत होत. या मुन्नाभाई अर्थात भावी डॉक्टरला पर्यवेक्षकांनी पकडले. मुन्नाभाईप्रमाणे पर्यवेक्षकासमोर त्यांनी कॉपी करीत असल्याचे मान्य केले. सुरुवातीला माफीनामा झाला. मात्र, पुढे हे प्रकरण नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सुपूर्द करण्यात आले. 

बुधवारी (ता.२४) हे प्रकरण मेडिकलच्या एपीआयमध्ये घडले. मागील आठवड्यात एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांनी हायटेक पद्धतीने केलेल्या अफलातून 'कॉपी' प्रकाराची चर्चा मेडिकलमध्ये सुरू असताना मेडिकलमध्ये बुधवारी (ता.२४) बालरोग विषयाचा लेखी पेपर सुरू असताना एका परिक्षार्थीला मुन्नाभाईच्या स्टाईलने कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले. कॉपीचा हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एका अधिकाऱ्याला याची माहिती दिली. ही माहिती आरोग्य विद्यापीठाचे पर्यवेक्षक यांना कळली. त्यांनी परीक्षा हॉलमध्ये नजर टाकली. हा सारा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रंगेहात पकडले. बाह्य बहिःशाल पर्यवेक्षक आणि येथील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांशी चर्चा झाली. त्यांनी हे प्रकरण मेडिकलमधील प्राध्यापकांच्या सुपूर्द करून अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे वळते केले. मात्र, त्यापूर्वीच हा सारा प्रकार नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात पोहोचला होता. यामुळे हे प्रकरण विद्यापीठाकडे पाठवण्यात आले. या मुन्नाभाईने अनेकदा विनवणी केली. क्षमा याचना केली. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. 

विद्यार्थ्यांची क्षमायाचना -
कॉपी करणाऱ्या मुन्नाभाई तसा स्वभावाने व इतर कामात प्रामाणिक आहे. त्याला यावेळी क्षमा करा. यापुढे असे घडणार नाही, अशी विनवणी करण्यासाठी काही विद्यार्थी आले. त्यांनी मेडिकलचे अधिष्ठाता यांच्यासहित संबंधित प्राध्यापक, सहयोग प्राध्यापक यांच्याकडे क्षमायाचना केली. मात्र, हे प्रकरण बरेच गाजले यामुळे विद्यापीठाकडे पाठवण्यात आले. या प्रकरणी मेडिकलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. 

प्रश्नाचे छायाचित्र पाठवले मित्रांना - 
त्या परिक्षार्थीने अतिशय शिताफीने मोबाईल परीक्षा हॉलमध्ये नेला. छुप्या पद्धतीने गुगलवरुन सर्च करीत उत्तरे लिहीत होता. गुगलवर उत्तरे न सापडलेल्या प्रश्नाचे छायाचित्र काढून व्हॉट्सअ‌ॅपवर मित्रांना पाठवत होता. उत्तरे मिळवून त्याचे पेपर सोडवणे सुरू होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT