md drugs ganja smuggling 171 accused arrested in 6 months nagpur Sakal
नागपूर

Nagpur Crime : नागपूर शहराला एमडीसह गांजा तस्करीचा विळखा; 6 महिन्यात 171 आरोपींना अटक

Nagpur Drugs Smuggling : नागपुरात गेल्या काही वर्षांमध्ये पब संस्कृती रुळल्याने रात्री उशिरापर्यंत तरुणाई पब व बारमध्ये थिरकताना दिसते.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : उपराजधानीत गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. आतापर्यंत सहा महिन्यांत १२६ गुन्हे याप्रकरणी दाखल करण्यात आले असून त्यामध्ये १७१ आरोपींना अटकही करण्यात आली.

नागपुरात गेल्या काही वर्षांमध्ये पब संस्कृती रुळल्याने रात्री उशिरापर्यंत तरुणाई पब व बारमध्ये थिरकताना दिसते. गेल्या वर्षी अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ४०४ प्रकरणांत ३ कोटी ४३ लाख १८ हजार ९८५ रुपयांचे पदार्थ जप्त करण्यात आले.

यामध्ये गांजा प्रकरणात ८६ गुन्हे तर एमडी प्रकरणात ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यात अनुक्रमे १११ आणि ८७ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय ३ कोटी ३५ लाख ५१ हजार ७५ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

यंदा सहा महिन्यातच ४ कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यामध्ये २६ प्रकरणांत २ कोटी १७ लाख ५० हजार ९४० रुपयांचे १ किलो ८२१ ग्रॅम एमडी जप्त करीत, ५४ जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, गांजाच्या ४० प्रकरणात ६९ लाख ३७ हजार १२५ रुपयाचा माल जप्त करीत १४९ जणांना अटक करण्यात आली. तर अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांविरोधात ५८ गुन्हे दाखल करीत, त्यात ६६ आरोपींना अटक केली आहे.

मोठे मासे केव्हा गवसणार?

अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांचे अभियान सुरू असल्याने कारवाईचे प्रमाण वाढले असले तरीही अद्याप मुख्य विक्रेत्यांसग त्यांच्या सिंडिकेटपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याचे वास्तव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT