Nagpur  esakal
नागपूर

Nagpur : मुलींच्या पंखांना बळ देणारी मीनाताई

वंचित मुलींची आई बनून समाजासमोर आदर्श

केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकल पालकांच्या पन्नासच्यावर मुलींच्या दुःखाला कवटाळून, त्यांना आकाशाला कवेत घेण्यासाठी बळ देणारी मीनाताई पाटील यांनी वंचित मुलींची आई बनून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय.

वंजारीनगरातील ‘जिव्हाळा’ परिवारातील मुलींच्या आयुष्याला दुःखाची झालर असते. मीनाताई त्यांच्या पाठीशी आईप्रमाणे उभ्या आहेत. त्या पन्नाशीतील आहेत. सकाळी ८ वाजतापासून खासगी सहकारी संस्थेत दिवसभर नोकरी केल्यानंतर सायंकाळी सर्व वेळ त्या मुलींसोबत घालवतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राशन करा हा बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र मुलींना देतात. भुकेल्यांना खाऊ घालण्यात अर्थ आहे. चालीरीतीच्या नावावर सोहळे करून पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात अर्थ नाही, ही शिकवण जिव्हाळातून मिळाल्याचे त्या सांगतात.

प्रत्येक मुलींचा आपआपला संघर्ष

अरुणाचल प्रदेशातील आरनिका चकमा एमबीए झाली. सीए करीत आहे. बॅंकेत नोकरी लागली. सरिता चकमा आणि पेरिसा चकमा इंजिनिअरिंग तर बोनादेवी आणि रोशीला चकमा नर्सिंग करतेय. रेणुका चकमा बीबीएच्या अंतिम वर्षाला आहे. किरस्तानी चकम इंजिनिअरिंग तर सुनसुती, अमिशा, सुचित्रा आणि ज्युरिना या सर्व शिकत आहेत. विदर्भातील आँचल पाटील सीए करीत आहे. यवतमाळची ‘सृष्टी’ बी.एस्सी. झाली. पन्नास सदस्य सध्या मीनाताईच्या कुटुंबात आहेत. एकल पालकांच्या किंवा पालकांचे छत्र हरविलेल्या मुली जुळल्या आहेत. शिकून या मुली स्वत:च्या पायावर उभे राहाव्या हीच मीनाताईंची एखाद्या आईप्रमाणे इच्छा आहे.

चाळीस ते पन्नास मुलींचे हे कुटुंब आहे. मुलींना आधार नसला तरी त्याची जाणीव त्यांना होऊ देत नाही. विदर्भ आणि अरुणाचल प्रदेशातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कार्य सुरू आहे. ज्या गरजू मुलांना शिक्षणाची आवड आहे, परंतु परिस्थिती अभावी शिकू शकत नाही त्यांच्या पालनपोषणापासून शिक्षणाची जबाबदारी आम्ही सांभाळतो.

-मीना पाटील, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT