Bombay High Court

 

esakal

नागपूर

MHADA Seniority Case: भरतीतील गुणवत्ता क्रमच ज्येष्ठतेचा आधार;उच्च न्यायालयाचे निरीक्षण; अभियंत्याची पदोन्नतीची मागणी फेटाळली

MHADA Seniority Case, Merit Ranking, Promotion Dispute प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भरती प्रक्रियेतील गुणवत्ता क्रमावर ज्येष्ठता ठरते, असे स्पष्ट केले. आधी रुजू झाल्यानेच ज्येष्ठता निश्चित होत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, : एकाच भरती प्रक्रियेत एकाच दिवशी नियुक्त झालेल्या सरळ सेवा कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता निवड प्रक्रियेदरम्यान निश्चित झालेल्या गुणवत्ता क्रमाने ठरते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. म्हाडामधील दोन सहाय्यक अभियंत्यांच्या ज्येष्ठतेच्या वादावर निर्णय देताना केवळ आधी रुजू झाल्याच्या आधारावर एखादा कर्मचारी ज्येष्ठता ठरत नाही, असेही न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले. या निकषाच्या आधारे म्हाडातील द्वितीय श्रेणी साहाय्यक अभियंता दिलीप कळसकर यांनी उपअभियंता

पदावरील पदोन्नतीसाठी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, म्हाडाच्या अमरावती विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या दिलीप कळसकर यांनी अमोल बुधकोंडवार यांना देण्यात आलेल्या उपअभियंता पदावरील पदोन्नतीला आव्हान दिले होते. आपण बुधकोंडवार यांच्यापेक्षा वरिष्ठ असल्याचा दावा कळसकर यांनी केला होता. दोघांचीही १९ जुलै २००८ रोजी एकाच भरती प्रक्रियेत नियुक्ती झाली होती. कळसकर २१ जुलै रोजी सेवेत रुजू झाले, तर बुधकोंडवार यांनी १ ऑगस्ट रोजी सेवा स्वीकारली. मात्र, निवड प्रक्रियेत बुधकोंडवार यांना ६८.४० गुण मिळाले होते आणि ते गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर होते.

एमएस-सीआयटीमुळे ज्येष्ठता रद्द होत नाही

बुधकोंडवार यांनी नियुक्तीच्या वेळी निश्‍चित कालावधीत एमएस-सीआयटीची आवश्यक पात्रता प्राप्त केली नव्हती. त्यांनी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाने १ नोव्हेंबर २०१३ रोजी आदेश काढून त्यांची सेवा २६ नोव्हेंबर २०१२ पासून नियमित केली. या नियमितीकरणाला स्वतंत्रपणे आव्हान देऊन ते रद्द करण्यात आलेले नाही, याची न्यायालयाने नोंद घेतली. त्यामुळे एमएस-सीआयटीची परीक्षा उशिरा उत्तीर्ण केल्याच्या एकमेव कारणावरून बुधकोंडवार यांची ज्येष्ठता रद्द होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पदोन्नती हा आपोआप मिळणारा हक्क नाही

आवश्यक सेवाकाल पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा आपोआप हक्क प्राप्त होत नाही. नियमांनुसार पदोन्नतीसाठी विचार केला जाण्याचा अधिकार मात्र त्याला असतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. बुधकोंडवार यांची पदोन्नती नियमबाह्य अथवा आरक्षणाच्या रोस्टरच्या विरोधात झाल्याचे कळसकर यांना सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

कळसकर यांना ६४.८० गुण मिळाल्याने त्यांचा गुणवत्ता क्रमांक दुसरा होता. न्यायालयाने एकाच दिवशी नियुक्त झालेल्या सरळ सेवा कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता निवड प्राधिकरणाने निश्चित केलेल्या गुणवत्ता क्रमवारीनुसार ठरवली जाते, असे म्हाडाच्या १९८७ मधील ज्येष्ठता नियमांचा संदर्भ देत स्पष्ट केले. त्यामुळे सेवेत उशिरा रुजू झाले असले तरी गुणवत्ता क्रमवारीत पुढे असलेले बुधकोंडवार हेच ज्येष्ठ ठरतात, असे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT