Nitin Gadkari News sakal
नागपूर

Nagpur : ‘महाराष्ट्र पोलिस बहोत अच्छे है’ गडकरींना धमकी देणाराच करतोय पोलिसांचं कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ कांथा याला विमानाने नागपुरात आणलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात फोन करत १० कोटी रुपयांची खंडणी आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेशला धंतोली पोलिसांनी चौकशीसाठी विमानाने नागपुरात आणलं आहे. सध्या तो कोठडीत असून त्याच्या चौकशीदरम्यान त्याने ‘महाराष्ट्र पोलिस बहोत अच्छा है’ असे म्हणत पोलिसांचं कौतुक केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ कांथा याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाने मंगळवारी सकाळी नागपुरात आणलं. जयेशने बेळगावच्या कारागृहातूनच १४ जानेवारीला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन फोन कॉल्स केले. त्यातून त्याने शंभर कोटींची खंडणी मागितली होती.

दोन महिन्यांनंतर २१ मार्चला सकाळी १०.४५ ते ११.१५ दरम्यान तीन फोन कॉल्स करून आरोपीने दहा कोटींची खंडणी मागितली. यासाठी एका युवतीच्या मोबाईलचा त्याने वापर केला होता. १४ जानेवारीला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता जयेशचा पत्ता शोधला. मात्र, कायदेशीर अडचणी आल्याने त्याला अटक करता आली नाही.

आता मात्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने अचानक बेळगाव कारागृहात झडती घेतली. कायदेशीर कारवाई करीत त्याला पकडून नागपुरात आणले. दरम्यान त्याची धंतोली पोलिसांकडून चौकशी करीत असताना तो अनेकदा वेगवेगळी माहिती देत असल्याची बाब समोर येत आहे. मात्र, त्याला राज्यात आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने तो सातत्याने पोलिसांचे कौतुक करताना दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT