Opposition Leader Ambadas Danve 
नागपूर

शेतकरी आत्महत्येला मंत्रीच जबाबदार ; अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे : आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे केले सांत्वन

सकाळ वृत्तसेवा

मारेगाव (जि. यवतमाळ) : सतत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात तीनवेळा पेरणी करूनही पीक खरडल्या गेली. नुकसानाची मालिका चालू असताना तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढतच आहे. शासनाने फक्त घोषवारा केला. परंतु थेट शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही.

लाभ मिळाला असता तर कदाचित शेतकरी आत्महत्येला लगाम बसला असता. सरकारची शेतकऱ्यांना प्रती उदासीनता असल्याचे बोलल्या जात असताना कोणतेही ठोस पाऊल उचलल्या गेले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. तालुक्यातील बोरीं (गदाजी) दांडगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला सांत्वनपर भेटीनंतर ते सोमवारी (ता.२०) बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार तथा जिल्हा सपंर्कप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, माजी जी. पं. सदस्य सुनील गेडाम, युवा सेना तालुकाप्रमुख मयुर ठाकरे उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी काही अडचणी आल्यास तातडीने मार्गी लावू, कुटुंबीयांनी खचून न जाता हिंमतीने लढले पाहिजे, आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहोत. त्यानंतर त्यानी वनोजा (देवी) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी करून दांडगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तोताराम चिंचोलकर यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कारप्राप्त कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त बोरीं (गदाजी) येथील शेतकरी पुंडलिक रुयारकर यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये रोख विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणने इस्रायलचं कंबरडं मोडलं! 'हेर' तयार करणारी फॅक्टरी क्षेपणास्त्राने उडवली

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार, 'या' मार्गावर 'जम्बो ब्लॉक' घेण्यात येणार; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

Otur road accident news: ओतूरमध्ये खड्डे चुकवताना ट्रक–स्कुटी अपघात; स्नेहल अहिनवे जागीच ठार

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

SCROLL FOR NEXT