Minister Sunil Kedar will be in trouble 
नागपूर

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार येणार अडचणीत!; १५० कोटींचा घोटाळा प्रकरण

योगेश बरवड

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील रोखे घोटाळा प्रकरणाचा प्रगती अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाला दिला आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. २४ सप्टेंबरला सरकारी साक्षीदारांची उलटतपासणी होणार आहे.

सुनील केदार बँकेचे अध्यक्ष असताना सुमारे १४९ कोटींचा रोखे घोटाळा उघडकीस आला होता. व्याजासह घोटाळ्याच्या रकमेचा आकडा १५० कोटींवर गेला आहे. घोटाळ्यात केदार यांच्यासह एकूण ११ आरोपींचा समावेश आहे. प्रकरणाचा खटला निकाली काढण्यासाठी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांचे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कारणांनी २००२ पासून खटला प्रलंबित आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रकरणाची सुनावणी वेगाने पुढे जात असून २०१९ मध्ये आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले. साक्षीदारांची तपासणीही सुरू असतानाच कोरोनाच्या संकटामुळे कामकाज थांबवावे लागले होते. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विशेष न्यायालयाने खटल्याचे कामकाज सुरू केले. १९ सप्टेंबर रोजी काही सरकारी साक्षीदारांचे बयान नोंदवण्यात आले होते. गुरुवारी त्यांची उलटतपासणी केली जाणार आहे.

गुरुवारी साक्षीदारांची उलटतपासणी

या प्रकरणातील खटल्याचे कामकाज सुरू व्हावे या विनंतीसह उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी झाली. गुरुवारी साक्षीदारांची उलटतपासणी केली जाणार असल्याची बाब न्यायालयात सांगण्यात आली. न्यायालयाने ही बाब रेकॉर्डवर घेतली. २००२ मध्ये रोखे घोटाला उघडकीस आला होता. विशेष लेखा परीक्षक विश्वनाथ असवार यांनी बँकेचे ऑडिट करून २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT