minister uday samant order to inquiry of the joint director of higher education nagpur news 
नागपूर

उच्चशिक्षण सहसंचालकांची होणार चौकशी, उदय सामंत यांचे आदेश

मंगेश गोमासे

नागपूर : विभागात असलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीसाठी (प्लेसमेंट) प्राध्यापकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करावी लागत असल्याचा आरोप फुले- शाहू- आंबेडकर अध्यापक परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत दैनिक 'सकाळ' ने वृत्त प्रकाशित केल्यावर शुक्रवारी आयोजित जनता दरबारात प्राध्यापक संघटनांकडूनही तक्रारी देण्यात आल्यात. त्यावरुन उच्च व तंत्रशित्रण मंत्री उदय सामंत यांनी सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंके यांची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर पाच वर्षांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या करिअर अ‌ॅडव्हान्समेंट स्कीमनुसार (कॅस) स्थाननिश्चिती करणे गरजेचे असले. त्यामुळे त्यासाठी सहसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्यानुसार पहिल्या स्थाननिश्चितीची प्रक्रिया सुरू होते. यानंतर प्राध्यापक एम.फिल असल्यास ४ वर्षांनी दुसरी नसल्यात पाच वर्षांनी स्थाननिश्चितीसाठी होत असते. तसेच पुढल्या तीन वर्षांनी तिसरी स्थाननिश्चिती केल्या जाते. सहसंचालकांकडून पहिल्या स्थाननिश्चिसाठी वीस हजार, दुसऱ्या व तिसऱ्यासाठी तीस हजार व प्रोफेसरसाठी पन्नास हजार रुपये रक्कम घेण्यात येत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला होता. याशिवाय शुक्रवारी वसंतराव देशपांडे सभागृहात याबाबत विविध संघटनांनी सामंत यांना निवेदन सादर केले. त्यातूनच सामंत यांनी चौकशीचे आदेश दिले. याशिवाच पंधरा दिवसात अहवाल सादर करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही चौकशी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न करता दुसऱ्या विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यापीठातही अधिकाऱ्यांना झापले - 
विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांशी सामंत यांनी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांच्या मोबाईलवर बातमी दिसताच, त्यांनी सहसंचालकांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी कार्यालयात होणाऱ्या या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत चांगलेच झापले. याशिवाय त्याच्याविरुद्ध जनता दरबारातही आलेल्या तक्रारीवरुन बरेच सुनावले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT