Nagpur railway station  e sakal
नागपूर

अल्पवयीन मुलीने घर सोडले, तिकीट विचारताच समोर आला प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता अल्पवयीन मुलीने घर सोडले. थेट स्थानक गाठून रेल्वेत जाऊन बसली. ही रेल्वे नागपूर स्थानकावर (nagpur railway station) पोहोचत असताना तिकीट तपासणी कर्मचाऱ्याचे तिच्याकडे लक्ष गेले. विचारणा केली असता तिच्याकडे तिकीटही नव्हते. संभाव्य धोके लक्षात घेता तिला ताब्यात घेण्यात आले. नातेवाइकांना मुलगी गवसल्याची माहिती देऊन तिला शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. (minor girl traveled without ticket in mumbai nagpur train)

तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारी ही मुलगी १५ ते १६ वर्षे वयोगटातील आहे. तिच्या सांगण्याप्रमाणे ती मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या दुरांतोमध्ये बसली. जवळ पैसे नसल्याने तिकीटही घेतली नाही. छिंदवाडा येथील नातेवाइकाकडे जात असल्याचे ती सांगते. पण, तिच्या आणि पालकांकडून मिळालेल्या माहितीत बरीच विसंगती आहे. यामुळे हे प्रकरण काहीसे संशयास्पदही आहे. मुलगी एकटीच प्रवास करीत असल्याने तिकीट तपासणी कर्मचारी तिच्याकडे लक्ष ठेवून होते. तिच्या हालचाली संशयास्पद जाणवत होत्या. पण, रात्रीचा प्रवास असल्याने ते शांत राहिले. सकाळी नागपूर स्थानकजवळ येत असताना त्यांनी मुलीकडे तिकीटची विचारणा केली. घाबरलेल्या अवस्थेत तिने तिकीट नसल्याचे सांगितले. कुठे जात आहे याबाबत ती योग्य माहिती देऊ शकत नव्हती. मुलगी एकाकी असल्याने त्यांनी तिला रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. आरपीएफ जवानांनी चौकशीसाठी तिला रेल्वे चाइल्ड लाईनच्या सुपूर्द केले. चाइल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी तिला लोहमार्ग पोलिसांकडे दिले. पोलिसांनी कागदोपत्री कारवाईनंतर नियमाप्रमाणे तिला शासकीय मुलींच्या बालगृहात सुरक्षित पोहोचविले. तिच्या पालकांना मुलगी सापडल्याची माहिती देण्यात आली असून ते आल्यावरच बरीच माहिती स्पष्ट होई शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT