Nagpur crime sakal
नागपूर

अल्पवयीन मैत्रीण निघाली खूनी; अपमानाचा बदला घेण्यासाठी केला खून

भद्रावती येथे आढळलेल्या मुंडके नसलेल्या युवतीच्या खुनाचे रहस्य उलगडले

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : भद्रावती येथे आढळलेल्या मुंडके नसलेल्या युवतीच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. युवतीची रूममेट असलेली अल्पवयीन मैत्रीणच मारेकरी निघाली. दरम्यान दाताळा मार्गावरील ईरई नदीच्या पुलाखाली रविवारी सायंकाळी एका कापडी पिशवीत एका मुंडके व कपडे सापडले. हे मुंडके व कपडे गुडियाचेच आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मृत युवती नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी होती. अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशातून खून करण्यात आला. आरोपीला बेड्या ठोकल्या असून, हत्याकांडात मदत करणाऱ्या तिच्या मित्राचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भद्रावती-तेलवासा मार्गावरील शिवारात एका युवतीचा मुंडके नसलेला मृतदेह ४ एप्रिलला आढळला होता. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुंडके नसलेला मृतदेह नग्नावस्थेत होता. या प्रकरणाच्या तपासासाठी आठ पथके गठित करण्यात आली. सायबरतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. परंतु, काहीच हाती लागले नाही. अखेर सायबरच्या मदतीने तांत्रिक तपासात मृत मुलीचा मोबाईल क्रमांक मिळाला. ती नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी असून, गुडिया तिवारी (वय २२) असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृत युवतीच्या मोठ्या बहिणीशी संपर्क साधला. मृतदेहावरील व्रण, वापरातील वस्तूंवरून तिच्या बहिणीने खात्री केली.

तपासादरम्यान पथकाला मृत युवतीच्या रूम पार्टनरविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने सततच्या अपमानाचा बदला एका मित्राच्या मदतीने घेतल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. या तपासात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, सतीश बघमारे, गणेश भोयर, नईम खान, अनुप डांगे, मिलिंद जांभुळे, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंद्रे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे, उमेश रोडे यांनी परिश्रम घेतले.

मित्राच्या मदतीने रचला कट

गुडिया तिवारी आणि अल्पवयीन मुलगी या रूम पार्टनर होत्या. मात्र, त्यांच्यात काही दिवसांपासून वाद होत होते. गुडिया ही अन्य मित्रांसमोर तिला अपमानास्पद वागणूक देत होती. त्यामुळे अपमानाचा बदला घेण्याचे तिच्या मैत्रिणीने ठरविले. तिने आपल्या एका मित्रासोबत माहिती गुडियाला ठार मारण्याचा कट रचला. अल्पवयीन मुलीने मृत गुडियाला चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात ३ एप्रिलला रात्री ८.४५च्या सुमारास बोलाविले. तिघेही दुचाकीने भद्रावती येथील निर्जनस्थळी गेले. मैत्रिणीने गुडियाच्या मांडीवर चाकूने वार केले. मित्राने गळा दाबून खून केला. यानंतर चाकूने गुडियाचा गळा कापून तेथून पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT