Miracle of panchamukhi Swayambhu Mahadev temple in umred  
नागपूर

Video : श्रावण सोमवार; जमिनीच्या पातळीवर नंदी तर पंचमुखी शिवलिंग दहा फूट खोलात, वाचा अनोख्या मंदिराबद्दल...

सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : या वर्षीच्या श्रावण महिन्याचा आजचा शेवटचा सोमवार आहे. वैदिक काळापासून हिंदू धर्मात या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात शिवपिंडीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. असेच एक महादेवाचे प्राचीन त्यासोबतच रहस्यमयी शिवमंदिर उमरेड शहरातील मंगळवारीपेठेत अनेक वर्षांपासून इतिहासाची साक्ष देत उभे आहे. तलावाच्या पाण्याची पातळी आणि मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याची पातळी समतल असते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

मंदिराचे वैशिष्ट्य असे की, मंदिराचा गाभारा जमिनीपासून साधारणतः १० फूट खोल आहे. त्या ठिकाणी पंचमुखी शिवलिंगाची स्थापना केली आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रावणात या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक पाण्याची पातळी वाढत जाते आणि शिवलिंग पाण्याखाली येते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नंदी जमिनीच्या पातळीवर आहे. परंतु, गाभाऱ्यात असणारे स्वयंभू पंचमुखी शिवलिंग दहा फूट खोलात असल्याने हे मंदिर अनोखे वाटते. महादेवाचे शिवलिंग आणि त्यासमोर असलेला नंदी हे प्रत्येक मंदिरात समतल असल्याचे पाहायला मिळते. परंतु येथे तसे नाही.

जाणून घ्या - Video : खासदार नवनीत राणा म्हणाल्या खूप वेदना झाल्या पण मी मरता मरता वाचली, कारण...

मंदिरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गांधीसागर जलाशयाच्या (गाव तलाव) पाण्याची पातळी पावसाच्या पाण्याने जसजशी वाढते तशीच मंदिराच्या गाभाऱ्यात देखील वाढते, अशी आख्यायिका या ठिकाणी ऐकिवात आहे. तलावातील जलवाहिन्या थेट मंदिराच्या गाभाऱ्याशी जोडल्या गेल्या असल्याने त्या ठिकाणी झरे असल्याचे दिसून येतात. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील पाण्याचे झरे बुजविण्याचा प्रयत्न स्थापत्य अभियंत्यांनी केला, परंतु त्यात ते सपशेल अपयशी ठरले. श्रावण महिन्यात कायम गर्दीने गजबजले असणारे पाताळेश्वर मंदिर यावेळी कोरोनाचा पार्श्वभूमीवर भाविकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.


उत्तरेला प्राचीन काळा गणपती तर दक्षिणेला लाल गणपतीचे मंदिर

पाताळेश्वर मंदिराच्या उत्तरेला प्राचीन काळा गणपती तर दक्षिणेला लाल गणपतीचे मंदिर आहे. एकूणच तो परिसर पूर्वी उमरेड नगरीवर राज्य करणाऱ्या राजाच्या काळात अतिशय महत्वाचा आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याचे समजते. दरवर्षी दूरवरून महादेवाचा जलाभिषेक करणारी जल देवता आणि देवाधिदेव उमापती पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी भेट देत असतात.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT