Mission Admission sakal
नागपूर

Mission Admission : वाणिज्य, विज्ञानच्या प्रवेशासाठी लागणार कस; कला शाखेतही वाढणार गर्दी

बारावीच्या निकालात पावणे दोन टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे यावर्षी प्रत्येकच विद्यार्थ्याच्या टक्केवारीत वाढ झाली. याचा परिणाम आता प्रवेशावर होणार.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - बारावीच्या निकालात पावणे दोन टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे यावर्षी प्रत्येकच विद्यार्थ्याच्या टक्केवारीत वाढ झाली. याचा परिणाम आता प्रवेशावर होणार असून नामवंत महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. विद्यापीठाच्या नोंदणीनंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू होणार आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे बारावीचा निकाल ९२.१२ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावणेदोन टक्क्यांनी निकालात वाढ झाली. यावर्षी विभागात ११ हजार १९८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत एकूण ५४ हजार २९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५०१ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश विद्यार्थी विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे आहेत.

त्यामुळे या शाखांमधील नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून रांगा यंदाही रांगा लागणार आहे. त्यामध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था, हिस्लॉप, कमला नेहरू, मोहता सायंन्स, वाणिज्य शाखेसाठी जी.एस. कॉमर्स, डीएनसी, बिंझाणी आणि इतर महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे या महाविद्यालयांच्या प्रवेशाचा वाणिज्य, विज्ञानच्या प्रवेशासाठी लागणार कस, ‘कट ऑफ’ वाढणार आहे.

दुसरीकडे कला शाखेतील जागांच्या तुलनेत विद्यार्थी अधिक उत्तीर्ण झाल्याने कला शाखेतील रिक्त जागांचे गुहाळ यंदा संपणार असल्याचे दिसून येणार आहे. कला शाखेत प्रवेशासाठी हिस्लॉप, मॉरीस आणि एसएफएसला विद्यार्थी नेहमीच पहिली पसंती दर्शवितात. त्यामुळे यावर्षी या महाविद्यालयांत गर्दी वाढणार आहे.

बारावीतील ग्रेडनिहाय निकाल

  • प्रावीण्यप्राप्त - ११,०२४

  • प्रथम श्रेणी - ४१,९६७

  • द्वितीय -६९,७११

  • तृतीय श्रेणी - २०,४२९

  • नागपूर विभागातील एकूण विद्यार्थी - १,४७, ५७७

  • विज्ञान - ८०४२५

  • वाणिज्य- १५१७८

  • कला - ४२७६९

  • व्होकेशनल - ४२९५

  • टेक-सायन्स - ४६४

विद्यापीठ नोंदणी ३ जून पासून

पदवी प्रवेशासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेशासाठी प्रथम नोंदणी करण्याच्या अनुषंगाने ३ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. ती पूर्ण होताच महाविद्यालयस्तरावर पदवी प्रवेशाला सुरुवात होणार आहे.

चार हजारांनी वाढली प्रावीण्य श्रेणी

यंदा प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या चार हजाराने वाढली आहे. प्रावीण्य श्रेणीत (७५ टक्क्यांच्या वर) विभागात ११ हजार २४ तर प्रथम क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची ४१ हजार ९६७ इतकी आहे. तोच गेल्यावर्षीच्या तुलनेत द्वितीय श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये घट झाली आहे. गेल्यावर्षी द्वितीय श्रेणीत ७१ हजार ३५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ती संख्या दीड हजाराने घटून ६९ हजार ७११ वर आली आहे. याशिवाय तृतीय श्रेणीत २०२३ ला २६ हजार ८९४ तर यंदाच्या निकालात त्यात सहा हजारावर विद्यार्थ्याची घट झाली असल्याने ती संख्या २० हजार ४२९ वर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT