Nagpur University 
नागपूर

Nagpur : एमकेसीएलच्या कंत्राटाची होणार चौकशी

नागपूर विद्यापीठ : उच्च, तंत्रशिक्षण मंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा कामाचे कंत्राट काळ्या यादीत असलेल्या एमकेसीएलला देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी घेतला. या निर्णयाला स्थानिक आमदारांसह सदस्यांनीही विरोध केला असताना, त्याला डावलून कुलगुरुंनी एमकेसीएलला कंत्राट दिले. त्यामुळे याबाबत आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत प्रश्‍न मांडल्यावर या कंत्राटाची चौकशी करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

विद्यापीठात २०१६ पर्यंत परीक्षेच्या कामाची जबाबदारी ‘एमकेसीएल’ देण्यात आली होती. मात्र, केलेल्या कराराप्रमाणे एमकेसीएलद्वारे विद्यापीठाला सेवा देण्यात येत नसल्याचा ठपका ‘एमकेसीएल’वर ठेवण्यात आला होता. याबाबत अनेकदा सिनेटच्या बैठकीत सदस्यांनी ताशेरे ओढले होते. विशेष म्हणजे त्यामुळे २०१४ ते २०१६ दरम्यान ‘एमकेसीएल’द्वारे बऱ्याच प्रमाणात सेवा देण्यात हयगय होत असल्याने साडेतीन कोटींचे बील विद्यापीठाने थांबवून ठेवले होते.

याशिवाय २०१६ पासून परीक्षेच्या कामासाठी आयोजित निविदांप्रक्रियेत एमकेसीएलला काळ्या यादीतही टाकण्यात आले. याशिवाय जानेवारी २०१६ मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढून ‘एमकेसीएल’ला राज्य संचालित कंपनीच्या श्रेणीतून वगळले होते. मात्र, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुन्हा एमकेसीएलला परीक्षेचे कंत्राट देण्याचे ठरविले.

दरम्यान त्यांना विद्यापीठाने थांबवून ठेवलेले साडेतीन कोटी रुपयेही परत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सिनेट सदस्यांनी विरोध केला. मात्र, कुलगुरूंनी स्वतः जबाबदारी घेत, त्यांना कंत्राट दिले. तसेच प्रथम वर्षाच्या परीक्षा ते गुणपत्रिका देण्यापर्यंत कामे दिलीत.

गुरुवारी या संदर्भात ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्‍न उपस्थित करीत, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय प्रविण दटके यांनीही एमकेसीएलला पैसे देण्यासाठी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्यात येत असल्याची बाब उपस्थित केली. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बैठक होणार असून तत्काळ नोटीस जारी केली जाईल. बैठक आणि तपासात आमदारांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच महिन्यांपासून निकालाची प्रतीक्षा

विद्यापीठातील हिवाळी परीक्षांच्या बी.ए. आणि अभियांत्रिकी (बी.ई.) प्रथम सत्राच्या परीक्षांचे निकाल पाच महिने उलटूनही रखडले आहेत. प्रशासनाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून दुसऱ्या सत्राचे प्रवेशही रखडले आहेत. परीक्षांमध्ये प्रचंड घोळ केल्याचा पूर्वइतिहास पाठीशी असतानाही महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘विश्वास’ टाकल्याचा परिणाम हिवाळी परीक्षेतील विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू? भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच उत्तर दिलं, 'त्याच्याबद्दलची चर्चा...'

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत सुताच्या गोडाऊनला भीषण आग

Leopard Found Dead in Satara : साताऱ्यात उसाच्या फडात काय होतं? पाचटीत सडलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह; बळी गेला की घातपात?

HSC Science paper leak : बारावी सायन्स फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा

Bagalkot Shivaji Jayanti Violence : बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक; तीन पोलिस जखमी, मुख्य आरोपी तंजीरसह आठ जण अटकेत

SCROLL FOR NEXT