MLA Mungantiwar Demand CM fund help to families of nine persons died in accident sakal
नागपूर

चंद्रपूर : मृतांच्‍या कुटुंबीयांना प्रत्‍येकी पाच लाखांची मदत जाहीर

आमदार मुनगंटीवार, आमदार जोरगेवार यांच्‍या मागणीनुसार मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे डिझेल टॅंकर व लाकडांनी भरलेल्या ट्रकमध्ये झालेल्‍या भीषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नऊ जणांच्‍या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली होती.

या मागणीच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्‍येकी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्‍याची घोषणा केली आहे. अपघातानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्‍यमंत्री निधीतून मृतांच्‍या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्‍याची मागणी केली होती. मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्‍याशी त्‍यांनी चर्चादेखील केली.

जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्‍ताव शासनाला पाठविण्‍याची विनंती केली. अजयपूर येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली होती.

आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्‍येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

बल्लारपूर : चंद्रपूर-मूल महामार्गावर गुरुवारी रात्री डिझेल टँकर व ट्रक अपघातात वाहनांतील नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. नऊपैकी पाच जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली गावातील होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता पाचही मृतांवर मोक्षधाम येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांनी टाहो फोडला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दहेलीतील प्रशांत नगराळे (वय ३३), मंगेश टिपले (वय ३०), भय्यालाल परचाके (वय २४), बाळकृष्ण तेलंग (वय ५७) आणि साईनाथ कोडापे (वय ४०) यांचा समावेश होता. रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाचही मृतदेह गावात पोहोचले. पाचही मृतांवर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गावातील मोक्षाधम येथे सामूहिक अंत्यविधी करण्यात आला. स्मशानभूमीत उजेड नसल्यामुळे मोबाईल आणि बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT