railway sakal
नागपूर

रेल्वे स्थानकावर लवकरच आधुनिक ‘व्हीएसएस’ प्रणाली

राज्यातील ११० स्थानकावरही लागणार यंत्रणा ः प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - प्रवाशांची सेवा आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्याच्याच भाग म्हणून नागपूर मध्यवर्ती स्थानकावर लवकरच आधुनिक व्हिडीओ सर्व्हिलन्स सिस्टीम (व्हीएसएस) बसविण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाला मिळाला असून लवकरच काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. ही यंत्रणा राज्यातील ११० स्थानकांवर लवकरच कार्यान्वित होईल.

रेलटेलकडून व्हीएसएस प्रणाली प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असेल. या अंतर्गत रेल्वे स्थानकातील फलाटावरील मोक्याच्या ठिकाणी पॅनिक बटण उभारण्यात येतील. याची जोडणी स्थानकांतील सीसीटीव्ही आणि रेल्वे सुरक्षादलाच्या चौकीत देण्यात येईल. हे बटण दाबताच याचा अलर्ट दोघांनाही मिळेल. यामुळे तातडीने सुरक्षा दलाकडून मदत मिळेल. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाचा जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत पॅनिक बटण लावलेल्या ठिकाणाकडे सीसीटीव्ही झूम होऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करेल, अशी रचना यात आहे.

रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नेमक्यावेळी हेल्पलाइन व्यस्त असते, पोलिस वेळेवर उपलब्ध नसताता असा अनुभव प्रवाशांना येतो. यामुळे प्रवाशांना मदत मिळवण्यात अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे फलाटांवर पॅनिक बटण कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीएसएस योजनेंतर्गत रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालय, आरक्षण काउंटर, पार्किंग क्षेत्र, मुख्य प्रवेश व निर्गमन, प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज, बुकिंग ऑफिस इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

निर्भया फंड अंतर्गत प्रकल्प

नागपूर विभागातील ६ रेल्वे स्थानकांमध्ये बल्लारशाह, चंद्रपूर, बैतूल, धामणगाव, सेवाग्राम आणि वर्ध्याचा समावेश आहे. भारतीय रेल्वे आणि रेलटेलद्वारे हा प्रकल्प निर्भया फंड अंतर्गत राबविण्यात येत आहे. हा प्रकल्पाचा पहिला टप्पा असून यात ए १,बी आणि सी श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अशी असेल यंत्रणा

  • आधुनिक व्हीएसएस प्रणाली झुममध्ये दूरवरील चित्र दिसणार स्पष्ट

  • व्हिडीओ रिकॉर्डिंगचा डाटा मिळणार प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

  • स्थानकावरील प्रत्येक बारिक हालचीलीवर नजर

  • फलाटावर मोक्याच्या ठिकाणी पॅनिक बटन विभागातील ६ स्थानकांचा समावेश

आधीपासून स्थानकावर व्हीएसएस प्रणाली कार्यान्वित आहे. मात्र, नवीन आधुनिक पद्धतीच्या व्हीएसएस प्रणालीचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होऊन काम सुरू होईल.

- विजय थूल, मंडल वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पुण्यात हवाई दलाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Yavatmal: पोलिस अधिकार्‍यांच्या विभागीय बदल्या; काही बदल्यांना स्थगिती; पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश

SCROLL FOR NEXT