Rain Rain
नागपूर

मॉन्सूनने घेतला विदर्भातून निरोप; तरीही वादळी पावसाचा इशारा

नरेंद्र चोरे

नागपूर : जवळपास चार महिने सक्रिय राहिलेल्या मॉन्सूनने अखेर विदर्भातून निरोप घेतला. मॉन्सूनने विदर्भातून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी केली. मात्र, जाता जाता वरुणराजाने सप्टेंबरमध्ये जोरदार दणका देऊन बळीराजाच्या आशेवर पाणी फेरले.

विदर्भात नऊ जूनला मॉन्सून दाखल झाला होता. चार महिन्यांच्या मुक्कामानंतर १२ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने अधिकृत निरोप घेतला. गेल्या दशकाचा विचार केल्यास मॉन्सून दुसऱ्यांदा लवकर माघारी परतला. यापूर्वी २०१८ मध्ये ६ ऑक्टोबरलाच मॉन्सूनची विदर्भातून ‘एक्झिट’ झाली होती. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाही विदर्भात सरासरी पाऊस झाला.

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकूण ९६८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जी सरासरी पावसाच्या (९४३ मिलिमीटर) तीन टक्के अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे यावर्षी सर्वाधिक पाऊस सप्टेंबरमध्ये २९६.९ मिलिमीटर कोसळला. तर सर्वांत कमी पावसाची (१७४.५ मिलिमीटर) नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली.

विविध जिल्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदा सर्वाधिक पाऊस गोंदिया जिल्ह्यात १,१४० मिलिमीटर, तर सर्वांत कमी ६९९ मिलिमीटर पावसाची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली. नागपूर जिल्ह्यात पावसाने हजारी (१,०५० मिलिमीटर) पार केली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने बहुतांश धरणे तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचेही संकट टळले आहे.

शनिवारनंतर वादळी पावसाचा इशारा

पावसाळा अधिकृतपणे संपला असला तरी, अवकाळीचे सावट अजूनही कायम आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो पश्चिमोत्तर दिशेने सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

गेल्या दशकातील मॉन्सूनची विदर्भातील ‘एक्झिट’

  • वर्ष तारीख

  • २०२१ १२ ऑक्टोबर

  • २०२० २६ ऑक्टोबर

  • २०१९ १५ ऑक्टोबर

  • २०१८ ६ ऑक्टोबर

  • २०१७ १७ ऑक्टोबर

  • २०१६ १५ ऑक्टोबर

  • २०१५ १५ ऑक्टोबर

  • २०१४ १७ ऑक्टोबर

  • २०१३ १९ ऑक्टोबर

  • २०१२ १५ ऑक्टोबर

विदर्भात मागील पाच वर्षांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

वर्ष एकूण पाऊस

  • २०२१ ९६८.४

  • २०२० ८५२.२

  • २०१९ ११०६

  • २०१८ ८७५.४

  • २०१७ १०४५

यंदाचा एकूण पाऊस (मिलिमीटरमध्ये)

महिना एकूण पाऊस

  • जून २०३.७

  • जुलै २९३.७

  • ऑगस्ट १७४.८

  • सप्टेंबर २९६.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT