monsoon sakal
नागपूर

Monsoon : मॉन्सूनपूर्व पावसाची नागपूरमध्ये दमदार सलामी

वातावरण आल्हाददायक झाल्याने नागपूरकर सुखावले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरवत वरुणराजाने सोमवारी दमदार हजेरी लावून नागपूरकरांना सुखद धक्का दिला. रात्री नऊच्या सुमारास शहरातील अनेक भागांत जोरदार मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला. पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाल्याने ऊन व उकाड्याने घामाघूम झालेले नागपूरकर सुखावले.

शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवला. उन्हामुळे त्रस्त असलेले नागपूरकर दोन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत होते. आकाशात ढग गोळा होत होते, मात्र पाऊस पडत नव्हता. परिणामी अस्वस्थता वाढली होती. अखेर रात्री नऊच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावून नागपूरकरांना सुखद धक्का दिला.

पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झाले. वादळासह जवळपास अर्धा ते पाऊण तास बरसलेल्या पावसाने नागरिकांची पार तारांबळ उडविली. पावसामुळे रस्त्यांवर तसेच खोलगट भागांमध्येही पाणी साचले होते.

दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भातील कमाल तापमानात घट झाली. नागपूरचा पारा मात्र आजही ४२.८ अंशांवर कायम होता. रविवारी विदर्भात उच्चांकी ४५ अंशांवर गेलेला यवतमाळचा पाराही साडेचार अंशांनी घसरून ४०.५ अंशांवर आला. विदर्भात सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती येथे करण्यात आली. हवामान विभागाचा विदर्भात आणखी तीन-चार दिवस वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) असल्यामुळे पुन्हा मॉन्सूनपूर्व सरींची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT