Monsoon in Vidarbha till 15th June 
नागपूर

गुड न्यूज... विदर्भात 15 जूनपर्यंत मॉन्सून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार असून, अनुकूल वातावरण पुढेही कायम राहिल्यास मॉन्सून 15 जूनच्या आसपास विदर्भात धडक देण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंफान वादळामुळे अडखळलेल्या मॉन्सूनने पुन्हा वेग धरला असून, येत्या 72 तासांत तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्‍यता आहे. मॉन्सूनच्या प्रवासात कसलाही अडथळा न आल्यास तो विदर्भात निर्धारित वेळेत म्हणजेच 15 जूनपर्यंत विदर्भात येण्याची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टाही सध्या मॉन्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल मानला जात आहे. याउलट मॉन्सूनच्या मार्गात अडथळा आल्यास आगमन लांबणीवरही पडू शकते. 
सामान्यतः विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाची तारीख 15 जून आहे. मात्र गेल्या वर्षी आठवडाभर उशिरा म्हणजेच 22 जूनला आगमन झाले होते. त्याउपरही विदर्भात विक्रमी 1057 मिलिमीटर पाऊस बरसला होता, जो सरासरीच्या (943 मिलिमीटर) बारा टक्के अधिक होता. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यात वरुणराजा चांगलाच बरसला होता. यंदाही भारतीय हवामान विभागाने सरासरी पावसाचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. 

ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील उन्हाची लाट आज काहीशी ओसरली. तरीही सर्वाधिक तापमानाची नोंद नागपूर व चंद्रपूर येथे करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांत शुक्रवारी पारा 45.6 अंशांवर होता. त्याखालोखाल अमरावती येथे 45.4 आणि ब्रह्मपुरी येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाची लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असून, शनिवारनंतर मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT