more than seventeen hundred corona patients today in Nagpur  
नागपूर

कोरोनाचा महाविस्फोट! उपराजधानीत एका दिवसातील रुग्णांचा आकडा बघून बसेल धक्का; आता नियम पाळाच 

केवल जीवनतारे

नागपूर ः मागील २० दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा बाधितांचा आकडा दररोज वाढू लागला आहे. जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा महाविस्फोट झाला. एकाच दिवशी १ हजार ७१० जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. तर ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांचा आकडा अचानक फुगला. १२ हजार १६६ बाधित जिल्ह्यात आहेत. गृहविलगीकरणातील साडेआठ हजार बाधितांची धोक्याची घंटा नागपूरकरांवर आहे.

बुधवारी १० हजार ४५८ जणांच्या घशातील स्राव नमुना तपासला गेला. त्यातील १ हजार ७१० जण बाधित असल्याचे आढळले. ८ मृतांमध्ये तीन जण शहरातील, तीन जण ग्रामीण भागातील तर दोन जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. यामुळे आतापर्यंत ४ हजार ४१५ जणांना जीव गमवावा लागला आहे. 

हे चिंतेचे मळभ दिवसागणिक गहिरे होत असताना शहरातील बंद पडलेले कोविड सेंटर सुरू करण्यात येत नाही. खासगीमध्ये पुन्हा चाचण्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. बुधवारी ४ हजार ५४० चाचण्या या खासगी कोरोना तपासणी केंद्रांमध्ये झाल्या आहेत. ५० टक्के चाचण्या खासगीत तपासण्यात येत आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १३ लाख ३६ हजार ५५७ चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांपैकी १ लाख ६२ हजार ५३ जण बाधित आढळले आहेत. 

यापैकी शहरातील १ लाख २९ हजार ३६१ तर ग्रामीण भागातील ३१ हजार ७२३ जणांचा समावेश आहे. जिल्‍ह्याबाहेरून सुमारे ९६९ जणांना रेफर करण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख ४५ हजार ४७२ झाली आहे. यापैकी शहरातील १ लाख १७ हजार ३४३ तर ग्रामीण भागातील २८ हजार १२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सक्रिय बाधित १२ हजारांच्यापेक्षा जास्त

जिल्ह्यात उपचाराधीन असलेल्या बाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. चार हजारांवर आलेली सक्रिय बाधितांची संख्या आता १२ हजार १६६ वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. सध्या गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ६९४ आहे. तर उर्वरित दोन हजारांवर बाधितांवर मेडिकल, मेयोसहित इतर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT