Nagpur Chikungunya Update  Sakal
नागपूर

Nagpur Chikungunya Update : डासांचा डंख छोटा, धोका मोठा; नागपूर जिल्ह्यात चिकनगुनियाचे ५० रुग्ण

Nagpur Health Update : डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ डास ‘झिका’ विषाणूंचाही वाहक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ डास ‘झिका’ विषाणूंचाही वाहक आहे. सध्या डेगींचे आणि चिकनगुनियाचा प्रकोप उपराजधानीत सुरू झाला असून चिकन गुनियाचे जिह्ल्यात पन्नास रुग्ण आढळले आहेत. यामुळे ‘झिका’ विषाणूचा धोका उपराजधानीला होण्याची शक्यता आहे.

पालिकेने ‘एडिस इजिप्ती’ डासांची विशेष शोधमोहीम हाती घेण्याची गरज आहे. घरोघरी तापाने फणफणलेले रुग्ण आढळत आहेत. धरमपेठ, मंगळवारी झोनमधील विविध वस्त्यांमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. रहिवासी वसाहतीत डासांची उत्पत्ती वाढली आहे. सध्या चिकनगुनिया आजाराने थैमान घातले आहे.

या दोन झोनमधील वस्त्यांमध्ये चार घर सोडून किमान एकाने खाट धरल्याचे चित्र आहे. या दोन्ही झोनमधील वसाहतींमध्ये कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना कुठला ना कुठला आजार जडल्याने हा भाग आजारांचे माहेरघर झाला आहे.

महापालिका सुस्त...

महापालिकेच्या आरोग्य विभागातल्या नोंदी नुसार डेंगीपाठोपाठ चिकन गुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून ५०वर आकडा पोचला आहे. यामुळे महापालिकेने दर दिवसाला फवारणी करण्याची गरज आहे. मात्र मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने फवारणीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली. संशयितांच्या चाचण्यांची सोय देखील अनेक आरोग्य केंद्रात नसल्याने खासगीकडे धाव घ्यावी लागत असल्याचे नागरिक सांगतात.

नागपूर जिल्ह्यात चिकन गुनियाचे रुग्ण

  • शहर - ३९

  • ग्रामीण -११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT