most of the school taking student exam even after cancelled by government in nagpur 
नागपूर

सरकारने परीक्षा केल्या रद्द, पण शाळा ऐकायला तयार नाहीत; नामांकित शाळांकडून परीक्षा घेणे सुरूच

मंगेश गोमासे

नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचे आदेश शाळांना दिले. मात्र, विभागाचा आदेश धुडकावून शाळांद्वारे सर्रासपणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना प्रमोट करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. कोरोनाच्या प्रकोपामुळे मंत्र्यांच्या या निर्णयाचे शिक्षक व पालकांनी स्वागत केले. हाच नियम नववी आणि अकरावीलाही लागू करण्यात आला आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरातील काही नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कोरोना परिस्थितीचा फायदा घेत, काही शाळांनी विद्यार्थ्यांना विविध असाईनमेंट देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

शिक्षण विभागाकडेही तक्रार - 
शालेय शिक्षण विभागाद्वारे पहिली ते अकरावीच्या (दहावी वगळून) परीक्षा न घेण्याचे आदेश दिलेत. मात्र, ते आदेश शहरातील बऱ्याच शाळा मानत नसल्याने याबाबत काही पालकांनी शाळांविरोधात तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता विभाग त्याबाबत शाळांवर कोणती कारवाई करते, त्याकडे लक्ष लागले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT