women crime
women crime sakal media
नागपूर

आईनेच सख्ख्या मुलीची देहव्यापारासाठी केली वारंवार विक्री

अनिल कांबळे

नागपूर - सख्ख्या आईनेच १५ वर्षीय मुलीची २० लाखांत नातेवाईकांच्या माध्यमातून देहव्यापार करण्यासाठी आणि डान्सबारमध्ये नाचण्यासाठी विक्री केली. गेल्या चार वर्षांपासून त्या मुलींकडून वारंवार देहव्यापार करवून घेण्यात येत होता. शेवटी त्या मुलीच्या आजीच्या मदतीने लकडगंज पोलिसांनी तिच्या आईविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये मुलीच्या आईने पहिल्यांदा तिची विक्री करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. डांसबारमध्ये काम करायचे आहे, असे सांगून नातेवाईकांनी तिला सोबत नेले. काही दिवस तिला डान्सबारमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या डान्सबारमध्ये जायचे असल्याचे सांगून डांसबार ऐवजी मुलीला कुंटणखान्यात नेण्यात आले. तेथे तिला बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. तिने तेथे देहव्यापार करण्यास नकार दिल्याने तिला तिच्या आईच्या गावी पोहचविण्यात आले. त्यानंतर २०१८ मध्ये तिच्या आईने एका दलालासोबत मुलीचा सौदा करून मुलीची २० लाखात विक्री केली. तिला कुंटणखान्यात नेऊन जबरीने तिच्याकडून देहव्यापार करण्यात येत होता. मुलीने नकार दिला असता तो व्यक्ती तिला मारहाण करीत होता.

मुलगी अनेक ग्राहकांना शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असल्यामुळे तिच्याकडून काहीच फायदा होत नसल्याने त्या व्यक्तीने मुलीला तिच्या आईकडे आणून सोडले. २०२० मध्ये मुलीच्या आईने नागपूर येथे गंगाजमुनात कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसोबत सौदा करून मुलीला विकले. कुंटणखान्याची मालकीन तिच्याकडून जबरीने देहव्यापार करून घेत होती. मुलीने नकार दिला असता तिला मारहाण करीत होती. त्याचप्रमाणे ती महिला जेवणात अंमली पदार्थ मिसळवून तिला खायला देत होती. तसेच १६ वर्षांची असतानाच तिचा शारीरिक वाढ होण्यासाठी हार्मोन्सचे इंजेक्शन देत होती. २०२१ मध्ये एका ग्राहकाच्या मदतीने पीडित मुलीने गंगाजमुनातून पळ काढला आणि थेट आईकडे गेली. मुलीला काही दिवस ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तिच्या आईने व इतर नातेवाईकांनी तिला विकण्याची तयारी केली. ही माहिती मुलीच्या आजीने मुलीला सांगितली. त्याचप्रमाणे मुलीला व तिच्या ४ वर्षीय भावाला बसमध्ये बसवून पळवून लावले. नागपूरला आल्यानंतर ती थेट लकडगंज पोलिस ठाण्यात गेली आणि पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी पीटा आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT