Mount Black sakal
नागपूर

Mount Black : नागपूरच्या सागरने शिखर गाठले

उत्तराखंडमधील २० हजार ९५५ फूट उंचीचे शिखर केले सर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरचा युवा गिर्यारोहक सागर कुंभारेने बर्फ व उणे २० डिग्री तापमानाचा सामना करत उत्तराखंडमधील २० हजार ९५५ फूट उंचीचे माऊंट ब्लॅक हे शिखर सर करण्याचा अनोखा पराक्रम केला.

महाराष्ट्र नेव्ही युनिटचा एनसीसी कॅडेट असलेल्या सागरने ६३८७ मीटर उंचीचे हे शिखर ९ सप्टेंबरला चढायला सुरवात केली. सहा दिवसांच्या चढाईनंतर तो १४ सप्टेंबर रोजी शिखरावर पोहोचला. उंच शिखरावर सगळीकडे बर्फ व ऑक्सिजन कमी राहात असल्यामुळे सागरला चढताना खूप अडचणी गेल्या. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. सतत अपघात होण्याची भीती त्याच्या मनात होती. उल्लेखनीय म्हणजे, त्याने हे सहा दिवस केवळ बिस्किट्स, ड्राय फ्रुटस व चॉकलेट्स खावून काढलेत.

मात्र जिवासह कशाचीही पर्वा न करता जिद्दीने त्याने शिखर गाठले. गिर्यारोहकाच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारे हे अभियान होते, असे सांगून सागरने मोहिम यशस्वी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या कठीण व आव्हानात्मक मोहिमेत सागरसोबत भारतातीलच विजयप्रताप सिंग, मणी राणा, रघु बिष्ट व वेदांत रस्तोगी हे अन्य चार गिर्यारोहक होते. महाराष्ट्रातून सागर एकमेव गिर्यारोहक होता.

सागरने या मोहिमेची तीन महिन्यांपूर्वीपासून तयारी केली होती. फिटनेस वाढविण्यासाठी तो दररोज २० ते २५ किलो वजन उचलत होता. सागरने अनुभव मिळविण्यासाठी २०१७ मध्ये माऊंटअबू आणि गतवर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमधील सोलांग व्हॅलीतील १४ हजार ५०० फूट उंचीचे पातालसू हे शिखरावर चढाई केली होती. केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या सागरला लहानपणापासूनच साहसी खेळांबद्दल आकर्षण होते. भविष्यात यापेक्षाही आणखी कठीण साहसी मोहिमा फत्ते करण्याची इच्छा त्याने यावेळी बोलून दाखविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT