हिंगणा ः तहसीलदार संतोष खाडरे यांना निवेदन देताना आमदार समीर मेघे व कान्होलीबारा ग्रामस्थ.  
नागपूर

ते 22 जणही गावचेच, पण त्यांना गावाबाहेर आश्रमशाळेत ठेवण्याचा इशारा दिला, काय बरे केले "त्यांनी'?...

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि.नागपूर): नोकरीनिमित्त गावाबाहेर असणारे22 नागरिक कान्होलीबारा गावात दाखल झाले. त्यांना आदिवासी भटक्‍या विमुक्त जमातीच्या गावाबाहेर असलेल्या आश्रमशाळेत क्वारंटाइन करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावक-यांनी दिला.

कान्होलीबारा ग्रामस्थांचा इशारा
हिंगणा तालुक्‍यातील कान्होलीबारा गावातीलच 22 नागरिक कामाकरिता गावाबाहेर होते. ते गावात परतले. जिल्हा परिषद शाळेत सोयीस्कर नसल्यामुळे ठेवणे शक्‍य नाही. गावाबाहेर असलेल्या भटक्‍या विमुक्त आदिवासी आश्रमशाळेत 22 संशयित नागरिकांना ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु, शाळा व्यवस्थापनाने या संशयित नागरिकांना ठेवण्यास नकार दिला. याची माहिती मिळताच आमदार समीर मेघे, जि. प. सदस्य आतिश उमरे, पं. स. सदस्य संजय ढोडरे, सरपंच जितेंद्र बोटरे व गावातील नागरिक यांच्या उपस्थित तहसीलदार संतोष खांडरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून शासनाने नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या त्या 22 जणांना गावात आणून सोडले. परंतु गावक-यांच्या मनात कोरोनाची दहशत असल्यामुळे गावक-यांनी त्यांना आश्रमशाळेत 14 दिवस क्‍वॉरंटाईन ठेवण्याचा विचार केला.

हेही वाचा  : अधिकाऱ्यांने टाकला व्हॅट्‌सऍप गृपवर मॅसेज...जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले निवेदन
येत्या दोन दिवसांत जर संशयित नागरिकांना आश्रमशाळेत ठेवले नाही तर आश्रमशाळेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.आमदार समीर मेघेंच्या उपस्थित ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी श्रावण जुनघरे, अखिलेश पांडे, सुनील गव्हाळे, देवराव गव्हाळे, वसंता बुंडे, सिंधूताई काकडे, छाया गोहणे, सुवर्णा सोमनकर, सोनाबाई मोहीजे, शरद दुधबळे, गजानन गव्हाळे, नामदेवराव येलुरे, अरुणराव कडू, गणपतराव भांडेकर उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT