सुप्रिया सुळे sakal
नागपूर

ठाकरे अन् फडणवीसांची बंद दाराआड चर्चा? वाचा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात सेना चांगलीच आक्रमक झाली होती. दोन्ही पक्षामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. पण, शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (CM Thackeray and Fadnavis meeting) यांच्यामध्ये बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP supriya sule) काय म्हणाल्या? ते पाहुयात.

नागपूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, ''कोणीही काही बोललं की थोडासा वेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकींग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे इस्टंट कॉफीसारखं जीवन जगत नाही. त्यामुळे मला या गोष्टीची माहिती नाही. राज्यातील सगळ्या पक्षाचे लोक आपली विचारधारा, राजकारण सोडून चांगले संबंध ठेवत असतील तर मी मनापासून स्वागत करेन. कारण यशवंतराव चव्हाण यांचे सर्व पक्षांसोबत चांगले संबंध होते. त्यांचेच संस्कार माझ्यावर आहे. राजकीय मतभेद एकाठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी आहे.''

शुक्रवारी सह्याद्रीवर नेमकं काय घडलं?

सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची साधारण दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले व उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात १५ मिनिटं चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर शिवसेनेने घातलेला राडा याबाबत चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT