नागपूर

एमपीएससी व विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मंगेश गोमासे

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा-पूर्व परीक्षा ही ४ सप्टेंबरला होणार आहे. मात्र, याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षाही होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांना मुकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

नागपूर विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान राज्याच्या लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) नुसत्याच दुय्यम सेवा-पूर्व परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी शिकणारे अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी करतात.

४ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा महाराष्ट्र आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा-पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या जवळपास ४ लाख आहे. याच सुमारास विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा आहे. दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्यास अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. शिवाय एमपीएससीची परीक्षा ही दोन वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. मात्र, एकाच दिवशी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती परीक्षा द्यावी याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.

विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी

दोन वर्षांनंतर एमपीएससीद्वारे परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या परीक्षा देणे विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. मात्र, एकाच दिवशी परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी. याबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी निवेदन सादर केले आहे. यावेळी धम्मदीप लोखंडे, कमलेश उमाळे, अथांग करोडे, विशाल वहिले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT