file 
नागपूर

मुख्यमंत्री महोदय, ओडिशातील गर्भवती पत्नीला भेटू द्या हो !

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर)  : कामाच्या शोधात ओडिसावरून घरदार सोडून आलेल्या 11 मजुरांना कामठीत काम मिळाले. काम सुरू असतानाच कोरोनामुळे "लॉकडाउन' झाला अन्‌ सुरू झाली मजुरांची वाताहात. खाण्याची वा निवा-याचाही वांदा होउन बसला. अशात गावात गर्भवती असलेल्या पत्नीला सोडून आलेल्या एका मजुराची तगमग वाढली अन्‌ त्याने या तगमगीतून थेट मुख्यमंत्रयांनाच पत्र लिहून पत्नीला भेटण्याची गरज सांगीतली. त्या मजुराचे नाव सुनील अमित बिस्वास (रा. खिडीरपूर, पुरबापरा, जिल्हा नाडीया वेस्ट बंगाल) असे आहे.

वादळी पावसाने तंबूही उडाला
मजूर हा इतर दहा मजुरांसह कढोली गावात रेल्वेच्या उपयोगात येणाऱ्या सिमेंट खांब तयार करण्याच्या कंपनीत कंत्राटी कामासाठी आले आहेत. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडउनमुळे ते कढोली गावातच अडकून पडले. हे अकराही मजूर गावातीलच एका मोकळ्या जागेत तंबू घालून वास्तव्यास होते. सरपंच प्रांजल कढोली यांच्याकडून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र, परवाच्या दिवशी झालेल्या वादळी पावसाने तंबू तुटल्याने व घरात काहीच नसल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली. यातच स्वगृह गाठावे, या विवंचनेत नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या भेटीसाठी पत्नी असलेल्या ओडिीसा राज्यातील सुंदरगड तालुक्‍यातील दारलीपूर गावात जाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे त्याने विनंती केली. मात्र, परवानगी प्रलंबित असल्याने पत्नीला भेटीला जाण्याच्या आतुरतेत अडकलेल्या या मजूर सुजित बिस्वासने गतरात्री मुख्यमंत्री कार्यालयात अर्ज करताच संबंधित कार्यालयाकडून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंबेजकर व प्रशासनात खळबळ उडाली.

प्रशासनात उडाली खळबळ
या संदर्भात बीडीओ सचिन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, आरोग्य अधिकारी कातोरे, आरोग्यसेवक पृथ्वीराज डोंगरे, शर्मा, कढोलीच्या सरपंच प्रांजल राजेश वाघ, सचिव ब्रह्मानंद खडसे यांनी त्वरित त्या मजुरांशी भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याला सरपंचांकडून तात्पुरती मदत करण्यात आली. मात्र, वादळी पावसात निवाऱ्याची सोय असलेला तंबू निकामी झाल्याने त्यांची निवासाची सोयही त्वरित कढोलीच्या जि. प. शाळेत करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच या मजुराच्या पत्नीला भेटीला जाण्याच्या मागणीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांची भेट घालून देणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली. वेळीच सोय केल्याने या मजुरांनी प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT