नागपूर

मेडिकलमधील एमआरआय प्रतीक्षा यादी जिवावर बेतणारी

Impact of delayed MRI scans on patient health in Nagpur Medical:

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Medical's MRI Queue Turns Life-Threatening for Patients: मेडिकलमध्ये सोनोग्राफी, एमआरआय काढण्यासाठी पंधरा दिवसांची वेटिंग लिस्ट असते. रुग्णाची अवस्था बघून शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाते. मात्र पंधरा दिवसानंतर एमआरआय तपासणीची तारीख दिल्यावरही एमआरआय चाचणी वेळेत होत नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो, असे मेडिकलमध्ये होणारे मृत्यू नैसर्गिक नसून ही एकप्रकारे निष्काळजीमुळे होणारी हत्या आहे, अशा एक दोन तीन नव्हेतर अनेक प्रकरणांचा दाखला देत रुग्णांच्या व्यथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर मांडल्या. पालकमंत्री बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले.

दै. सकाळने एक दिवसापूर्वीच या विषयाला हात घातला असून रजत लांजेवार या रुग्णाला सोनोग्राफी काढण्यासाठी तब्बल पंधरा दिवसानंतरची तारीख दिली. विशेष असे की, डॉक्टरांनी ३० जून ही शस्त्रक्रियेची तारीख दिली. तारीख न बघता सोनोग्राफी काढण्याची तारीख देण्याचा रेडिओलॉजी विभागाचा अफलातून प्रकार सकाळने पुढे आणला होता. हीच स्थिती एमआरआय, सीटी स्कॅनची आहे.

मेडिकलमध्ये सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी अतिशय दुर्गम भागातून येतात. परंतु मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो. दिवसेंदिवस समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याची तक्रार प्रियदर्शी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेच्या शिष्टमंडळाने बावनकुळे यांची भेट घेत निवेदन दिले. यांसंदर्भात मेडिकल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही दखल घेण्यात येत नसल्याची खंत व्यक्त केली. शिष्टमंडळात सिद्धार्थ बनसोड, अमोल रामटेके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

अशा आहेत मागण्या

  • मेडिकलमध्ये चाचणीनंतर दोन तासांत रिपोर्ट देण्यात यावा.

  • मेडिकलमध्ये स्वच्छतागृह नेहमी कुलूप असतात. स्वच्छतागृह खुले करावे.

  • मेडिकलमधील एमआरआयची वेटिंग लिस्ट कमी करावी.

  • मेडिकलमधील वॉटर फिल्टर बंद आहेत.सुरु करण्यात यावे.

  • बाहेरच्या शिशूंना अतिदक्षता विभागात दाखल करून घेत नाही.

  • बाह्य शिशू रुग्णासाठी अतिदक्षता विभाग तात्काळ सुरू करावा.

  • रात्री रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने असामाजिक तत्त्वांचा हैदोस असतो.

  • मेडिकलशी संलग्न टी.बी. वॉर्डात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

  • मेडिकलमधील अभ्यांगत मंडळ स्थापन करण्यात यावे.

  • अति दक्षता विभागात कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी.

  • नातेवाईकच स्ट्रेचर ओढत असतात, हे थांबविण्यात यावे.

  • मेडिकलमधील सुरक्षा बलाकडून रुग्ण, नातेवाइकांवर होणारे हल्ले थांबवावे.

  • बीपीएल धारकांकडून कार्ड नोंदणी शुल्क रद्द करण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT