mukhyamantri mazi ladki bahan yojana  esakal
नागपूर

Ladki bahin Scheme : ‘लाडकी बहीण’चे नागपूर विभागात ६ लाख ५७ हजारांवर अर्ज

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला नागपूर विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ६ लाख ५७ हजार ९९४ लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला नागपूर विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ६ लाख ५७ हजार ९९४ लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदता यावा, यासाठी १४ हजार ६३७ मदतकेंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’मध्ये २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये इतकी रक्कम आधारलिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी नारीशक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मदत केंद्रावर पुरेशे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत.

विभागात १७ जुलैपर्यंत २ लाख ५२ हजार ५७ अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून ४ लाख ५ हजार ९३७ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ९१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ४०४ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ५२६ अर्ज प्राप्त झाले असून २ हजार ३८६ मदतकेंद्र सुरू करण्यात आली आहेत.

वर्धा जिल्ह्यात ४५ हजार ५७७ अर्ज प्राप्त झाले असून १ हजार ६२७ मदतकेंद्र) आहेत. भंडारा जिल्ह्यात ६३ हजार ३५६ अर्ज आले असून १ हजार ४१७ मदतकेंद्र सुरू करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात ८५ हजार २१५ अर्ज असून १ हजार ९०२ मदतकेंद्र तयार करण्यात आले. तर चंद्रपूर जिल्ह्यात ४० हजार ४०४ अर्ज असून २ हजार ३८६ मदतकेंद्र सुरू करण्यात आलेत.

अधिक माहितीसाठी १८१ टोल फ्री क्रमांक

या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८१ हा महिला हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यावर योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते'; सात दिवसांत आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात

Shaktipeeth Protest : ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला...

Video : "आरतीपेक्षा धिंगाणा जास्त" गणपतीच्या पूजेला कलाकारांचा डान्स पाहून नेटकरी भडकले ! म्हणाले..

Maratha Reservation : अटल सेतूवर मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांशी चकमक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Shivpratishthan Hindustan : राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील गोतस्कारांचे पाठीराखे, शिवप्रतिष्ठानचा आरोप

SCROLL FOR NEXT