Coconut Health Benefits sakal
नागपूर

Coconut Benefits: बहुगुणी नारळ वाढवितो शरीराची प्रतिकारशक्ती

नारळ अर्थात श्रीफळाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार-सन्मान करताना श्रीफळ दिले जाते.

सकाळ वृत्तसेवा

Coconut Health Benefits - नारळ अर्थात श्रीफळाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार-सन्मान करताना श्रीफळ दिले जाते.

पण धार्मिक दृष्ट्‍या जसे नारळाला महत्त्व आहे, तसेच शारीरिक दुर्बलता दूर करण्यातही नारळाला पहिला मान आहे. यामुळेच प्रसादाच्या रूपातही नारळ अग्रस्थानी असते.

नारळ वृक्षाला कल्पवृक्ष संबोधले जाते. नारळ शक्तिवर्धक आहे. त्याच्या फळाचा आणि पानांचादेखील वापर सर्वत्र होतो. ओल्या नारळाचा गर प्रथिनयुक्त असतो.

नारळाच्या तेलाचा फायदा त्वचेसाठी होतो. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींने नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला मसाज केल्यास त्वचेला झळाळी येते.

नारळाचे उपयोग

  • नारळाचे तेल डोक्याला लावून मालिश केल्याने केस मजबूत होतात

  • झाडाच्या मुळीच्या सेवनातून लघवीदोष दूर

  • लहान मुलांच्या फुफ्फुसाच्या आजारावर लाभदायी

  • हाडांची झीज भरून निघते

  • सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी नारळाचे तेल वापरले जाते.

अतिसेवन करू नये

  • हृदयविकाराच्या रुग्णांना अतिसेवन करू नये

  • अतिसेवनाने पोटात गॅस तयार होण्याची भीती

  • अतिसेवनाने पोटदुखी वाढण्याचीही शक्यता

२ सप्टेंबर जागतिक नारळदिन

ज्या प्रमाणे रोज डे, चॉकलेट डे साजरे केले जातात, त्याच धर्तीवर नारळाच्या आरोग्यदायी उपयुक्तता लक्षात घेत २ सप्टेंबरला जागतिक नारळदिन पाळला जातो. २ सप्टेंबर १९६९ रोजी एशियन आणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी सुरू झाली. या प्रदेशांमध्ये जगातील सर्वात जास्त नारळ उत्पादन केले जाते, हे विशेष.

गर्भवतीच्या आरोग्यासाठी तसेच गर्भातील बाळासाठीदेखील ओले किंवा सुके नारळ आरोग्यदायी आहे. बाळाच्या मांसपेशी यामुळे बळकट होतात. याशिवाय करवंटी जाळून नारळाच्या तेलातून लावल्यास खरूज किंवा गजकर्ण बरे होते. यामुळे प्रत्येकाने नारळाचे सेवन करावे.

- डॉ. रेणुका माईंदे, आहारतज्ज्ञ- नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT