Mumbai Police Action Nagpur Youth Arrested threatening to bomb crime esakal
नागपूर

Ngapur Crime News : बॉम्बस्फोटाची धमकी देणारा गजाआड

नागपुरातील युवकाला डहाणूत अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुंबईची बंदरे आणि जे.जे. रुग्णालयात स्फोट करण्याची धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी नागपूरच्या तरुणाला अटक केली आहे. अश्विन भारत म्हैसकर (२९) रा. डिगडोह, हिंगणा रोड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अश्विनला पालघरच्या डहाणू येथे पकडण्यात आले.

गत २४ फेब्रुवारीला दुपारी मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला ७०६६७९४१९१ या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. फोन करणाऱ्याने ड्युटीवर तैनात महिला अधिकाऱ्याला सांगितले की, मुंबईच्या बंदरांवर ९० किलो मेफेड्रॉन ड्रग्स आणि अनेक किलो स्फोटके पोहोचली आहेत. या स्फोटकांनी जे. जे. रुग्णालय, भेंडीबाजार आणि नळबाजार आदी भागात बॉम्बस्फोट घडविण्यात येतील.

अधिकाऱ्याने नाव विचारताच त्याने फोन ठेवला. नियंत्रण कक्षातून तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. पोलिसांनी सर्व भागांची सुरक्षा वाढवत बंदरांची तपासणी केली, मात्र कोणतीही स्फोटक सामुग्री आढळली नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी मोबाईल नंबर शोधून काढला.

हा नंबर नागपूर येथील रहिवासी असलेल्या अश्विनचा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचे टॉवर लोकेशन काढले असता तो पालघरच्या डहाणू येथे असल्याची माहिती मिळाली. डहाणू पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी अश्विनला अटक केली. अश्विन विरुद्ध सर जे. जे. ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत त्याने खोटी माहिती दिल्याचे सांगितले आहे. मात्र एनआयएकडून मुंबईत धोका असल्याची माहिती आधीच मिळाली असल्याने पोलिस प्रकरण गांभीर्याने घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT