Nagpur Muncipal Corporation
Nagpur Muncipal Corporation sakal
नागपूर

नागपूर : महानगरपालिका बांधकाम मलब्यातून तयार करणार वाळू, विटा!

राजेश प्रायकर - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात दररोज मोठ्या प्रमाणात बांधकामातील कचरा निघतो. याशिवाय अनेकजण नवे घर बांधण्यासाठी जुने पाडतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागते. यावर मनपाने उपाय शोधला आहे. बांधकामातील मलब्यावर प्रक्रिया करून रेती आण विटा तयार करण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादच्या कंपनीसोबत करार केला असून मनपा भांडेवाडी येथे प्रकल्प उभारला जाणार आहे.

शहरात बांधकाम व पाडाव कचरा महापालिकेसाठी डोकेदुखी ठरला होता. बांधकामातील विटा, सिमेंट, रेती घेऊन जाण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागत होता. आतापर्यंत रेती केवळ नदीतूनच येते, एवढेच सर्वांना माहीत होते. महापालिकेने या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी रामकी एन्व्हायरो इंजिनिअर लिमिटेडअंतर्गत कार्यरत ‘हैद्राबाद सीॲण्डडी वेस्ट’ कंपनीसोबत करार केला.

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मनपाचे अधिकारी तसेच कंपनीचे वरिष्ठ सहायक व्यवस्थापक माधवी जी. यांनी करारावर स्वाक्षरी केली. कंपनीला प्रक्रिया युनिट तयार करण्यासाठी मनपातर्फे भांडेवाडी येथे ५ एकर जमीन देण्यात आलेली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुक्रवारी जमिनीची पाहणी सुद्धा केली. यावेळी उपअभियंता राजेश दुफारे, रामकी एन्व्हायरो इंजिनिअर लिमिटेडचे व्यवस्थापक मेहबूब सुभानी शेख, कनिष्ठ अभियंता प्रशांत वाघमारे, सल्लागार मेसर्स आर. जगताप अँण्ड असोसिएटचे यादव उपस्थित होते.

पेव्हर ब्लॉक, टाईल्सही निर्मिती

बांधकाम मलब्यातून केवळ रेती आणि विटाच नव्हे तर आयब्लॉक, टाईल्सही तयार करणार आहे. यामुळे शहरातील मलब्याची समस्या दूर तर होईलच पण मनपाला महसूलही प्राप्त होऊ शकतो.

दररोज दोनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया

कंपनी दररोज जवळपास २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. यातून बांधकामाला रेती, विटा, पेव्हर ब्लॉक, टाईल्स बनविण्यात येणार आहे. सी अँड डी कचरा शहरातून गोळा करण्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधांची व्यवस्था कंपनी करणार आहे. हा महाराष्ट्रातील दुसरा प्रकल्प नागपुरात सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे शहरात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर, निवासी भागातील कचरा पूर्णपणे कमी होईल. यामुळे नागपूर शहर अधिक स्मार्ट आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT