नागपूर

अखेर झाडांच्या वेदनेवर महापालिकेचे मलम!

खिळे ठोकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर कारवाईसाठी पुढाकार घेतला. झाडांना खिळे ठोकून लावलेली जाहिरात, पोस्टर, भित्तिपत्रके पुढील तीन दिवसांत काढण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तीन दिवसानंतरही ज्या आस्थापनांची जाहिरात दिसेल, त्यांच्याविरोधात संबंधित भागातील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना महापालिकेला झाडांच्या वेदनेची कल्पना आल्याची चर्चा आहे.

गेल्या पाच वर्षांत ५ हजार २७४ झाडे कापण्यात आली. वर्षाला ५२७ तर महिन्याला ४४ झाडे कापली जात आहे. दोन दिवसांत सरासरी तीन झाडांवर कुऱ्हाड मारली जात असून पर्यावरणावर प्रहार होत आहे. याशिवाय जाहिरातींसाठी खिळे ठोकून झाडांवर आघातही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकदा काही झाडे यातूनच नष्ट होत आहे. झाडांवरील जाहिरातबाजीमुळे शहराच्या सौंदर्यालाही ग्रहण लागत आहे. झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांविरोधात जूनमध्ये सिटीझन फोरमने मोठे आंदोलन केले होते.

पर्यावरणप्रेमींनीही याविरोधात अनेकदा तक्रारी केल्या होत्या. अखेर आज आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उद्यान विभाग तसेच सर्व झोन अधिकाऱ्यांना दिले. शहरात रस्त्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून जाहिरातदार या झाडांवर खिळे ठोकून जाहिरात लावतात. झाडांना खिळे ठोकल्याने झाडांना इजा पोहोचून नुकसान होते. शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचून विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे तीन दिवसांत जाहिरात काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी तीन दिवसांत जाहिराती काढाव्या. तीन दिवसानंतर झाडांवर आढळणाऱ्या जाहिरातीसंदर्भात संबंधित जाहिरातदारांविरोधात मनपातर्फे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

-राधाकृष्णन बी.,

आयुक्त, मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT